फारुख अब्दुल्ला बरळले... म्हणे, ... तर चीनचा पाठिंबा घेऊ...वेब टीम : श्रीनगर

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. 


“केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केले, त्यामुळे लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीन आक्रमकता दाखवतोय” असा अजब दावा फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.


“कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. 


चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू होईल”, अशी अपेक्षा फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.


इंडिया टुडेशी बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी हे वादग्रस्त विधान केले.


“लडाखमध्ये LAC वर चीनकडून जे काही सुरु आहे, ते कलम ३७० रद्द केल्यामुळे चालू आहे.


 ते कधीही हे मान्य करणार नाहीत. त्यांच्या पाठिंब्याने कलम ३७० जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लागू होईल” अशी अपेक्षा फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.


“मी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रित केले नव्हते, पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांना फक्त निमंत्रितच केले नाही, तर त्यांच्यासोबत झोपाळयावर झोके सुद्धा घेतले. 


मोदी त्यांना चेन्नईला घेऊन गेले, तिथे त्यांच्यासोबत भोजनही केले” अशी टीका फारुख अब्दुल्ला यांनी केली. 


केंद्र सरकाने जम्मू-काश्मीरबद्दल घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “पाच ऑगस्टला सरकारने जे केले, ते आम्हाला मान्य नाही. 


संसदेत मला जम्मू-काश्मीरच्या समस्यांबद्दलही बोलू दिले जात नाही”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post