मुंबईतील पूर परिस्थितीवर गडकरींचा उपाय... मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिले पत्र...वेब टीम : नागपूर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. 


मुंबईत दरवर्षी उद्भवणाऱ्या पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलं आहे. 


पूरस्थितीमुळं दरवर्षी मुंबईमध्ये जीवितहानी, वित्तहानी, इमारतींची पडझड, रस्त्यांचे नुकसान होते. 


मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करून वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे. 


मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते.


मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. 


मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर करण्यात यावा. 


पुराची समस्या सोडवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. 


योग्य नियोजनपूर्वक पुराचे पाणी, ड्रेनेज, गडरलाईनचे पाणी ठाण्याकडे वळवून धरणात साठवता येईल. 


तिथे पाण्यावर प्रक्रिया करून नाशिक आणि अहमदनगरमधील शेतीला पाणी देता येईल. 


पुराचे पाणी दुष्काळी भागातदेखील वळवता येईल, अशी सूचना गडकरींनी केली आहे. 


मुंबईत दरवर्षी पुरामुळं रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. 


पूर येऊन गेल्यानंतर शासनाला स्वच्छता, आरोग्यसेवा पुरवणे अशी कामं करावी लागतात.


या काळात मालमत्तांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्या दुरुस्तीकडं लक्ष देता येत नाही; 


मात्र, रस्ते तातडीनं दुरुस्त करावे लागतात, असे गडकरींनी निदर्शनास आणून दिले. 


पारंपरिक पद्धतीनं बनवण्यात येणारे रस्ते अतिपाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे खराब होतात. 


त्यामुळे मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात यावं, अशी सूचना गडकरींनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 


मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचं उदाहरण नितीन गडकरींनी दिलं आहे.


कॉलन्यांमध्ये पाणी पुनर्वापर यंत्रणा उभी करावी. यामुळे मुंबई महापालिकेचे लाखो रुपये वाचतील. 


पुराचे पाणी, ड्रेनेजचं व्यवस्थापन या समस्या सोडवण्यासाठी एकात्मिक योजना राबवण्याची गरज आहे. 


ही समस्या सोडवण्यासाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेला जबाबदारी देण्यात यावी. 


जल पर्यटन सेवा सुरू करण्यात यावी. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाची मदत होईलच.  


मुंबईच्या विकासासाठी पुढाकार घ्या, असं आवाहन नितीन गडकरींनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post