वेब टीम : दिल्ली फेसबुक कंपनी इन्स्टाग्राम आणि मेसेंजर यांच्यात क्रॉस प्लैटफॉर्म मॅसेजिंगसाठी प्रयत्न सुरू आहे. फेसबुकने नुकताच या संदर्भात...
वेब टीम : दिल्ली
फेसबुक कंपनी इन्स्टाग्राम आणि मेसेंजर यांच्यात क्रॉस प्लैटफॉर्म मॅसेजिंगसाठी प्रयत्न सुरू आहे.
फेसबुकने नुकताच या संदर्भात माहिती दिली. यामध्ये फेसबुकला यशही मिळाले.
फेसबुकने नुकतेच क्रॉस ऍप मॅसेजिंग आणि कॉलिंग फीचर लाँच केले.
म्हणजे आता मॅसेंजरहून इंस्टा यूजर्सला किंवा इंस्ट्रावरुन मेसेंजरवरील युजर्सला मेसेज करणे किंवा फोन करणे शक्य झाले आहे.
यासारखी १० नवीन फिचर्स इंस्टाग्रामवर आली आहेत.
क्रॉस प्लॅटफ़ॉर्म मॅसेज : या फिचरमध्ये आता मॅसेंजरहून इंस्टा यूजर्सला मेसेज पाठवू शकतो किंवा फोनही करु शकतो. दोन्हीकडे तेच कॉन्टॅक्ट असेल तरच हे फिचर वापरता येते.
वॉच टुगेदर फ़ीचर : या फिचरनुसार फेसबुकवर एकत्र व्हिडीओ पाहू शकतो. हे व्हिडीओ फेसबुकवॉच, IGTV, Reels चे असतील.
वॅनिश मोड : या फिचरमध्ये तुम्ही पाठवलेले मेसेज समोरील व्यक्तीने वाचल्यानंतर चॅट विंडोतून बाहेर आल्यावर मेसेज डिलिट होणार.
सेल्फी स्टिकर्स : सेल्फी क्लिक केल्यानंतर याला बूमरँग स्टिकर्स करु शकतो.
कस्टम इमोजी रिएक्शन्स : यामध्ये फेवरेट ईमोजीचा शॉर्टकट तयार करु शकतो.
मेसेज कंट्रोल्स : या फिचर्सचा वापर करुन आपल्याला कोण मेसज करु शकतो हे ठरवू शकतो…अनावश्यक मेसेज टाळण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.
इनहँसमेंट रिपोर्टिंग आणि ब्लॉकिंग अपडेट : आता संपूर्ण संभाषणालाही रिपोर्ट करु शकतो. पहिल्यांदा फक्त एखाद्या मेसेजला रिपोर्ट करता येत होते.
चॅट कलर्स, फॉर्वर्डिंग,रिप्लाईज,एनिमिटेड मेसेज इफेक्ट्स हे फीचर्स उपलब्ध आहेत.
COMMENTS