कारशेडची जागा बदलल्याने मेट्रो प्रकल्पाचा खर्च ५ हजार कोटींनी वाढेल...वेब टीम : मुंबई

मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च सुमारे 5000 कोटी रुपयांनी वाढेल, 


हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी पाच वर्षे लागतील, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. 


याबाबत सोमय्या यांनी टि्वटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. 


मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 


ही संपूर्ण जागा एकही रुपया न आकारता मेट्रोला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 


या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांना महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच गाजला होता. 


पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून भाजप सरकारच्या काळात आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. 


आरेतील जंगल तोडून कारशेड करण्याला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. 


सोमय्या म्हणाले की कांजूरमध्ये मेट्रो कारशेड गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. 


त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल. सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे ? 


मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर ? 


या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post