पेटीएम वापरत आहात... मग तुमच्यासाठी आहे 'ही' खुशखबर...वेब टीम : मुंबई

एका सामान्य कुटुंबापासून तर एखाद्या मोठ्या कंपनीपर्यंत सगळ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे, अशी परिस्थिती सध्या देशात आहे. 


कोरोनामुळे बसलेला आर्थिक फटका मोठा आहे. येणारा काळ कठीण असून शकतो म्हणून सध्या लोक विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. 


अशातच आता बँकांनी व्याज दर कमी केल्यामुळे लोक गुंतवणुकीसाठी ईतर पर्याय शोधत आहेत. 


अशातच आता पेटीएम पेमेंट्स बँक मध्ये एफडी करणे फायद्याचे ठरू शकते. 


कारण, पेटीएम पेमेंट्स बँक 7 टक्के व्याज दराने एफडीची सुविधा देत आहे.


पेटीएमला थेट एफडी करण्याची सुविधा प्राप्त नसल्याने पेटीएम पेमेंट्स बँकेने यासाठी इंडसइंड बँकेशी पार्टनरशीप केली आहे.पेटीएम पेमेंट्स बँकच्या एफडीची वैशिष्ट्ये :-

  • पेटीएम पेमेंट बँकेच्या एफडीमध्ये मॅच्युरिटी पीरियड 13 महिन्यांचा आहे.
  • 7 टक्के व्याज मिळणार.
  • या एफडीमधील विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटी पीरिएडआधी जरी एफडी तोडली तरी कोणताही चार्ज द्यावा लागत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post