पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आहेत 'इतके' पैसे... आकडे वाचाल तर..वेब टीम : दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबरला आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला आहे. 


इतर भारतीयांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला पैसा बँकांमध्येच ठेवतात. 


त्यांनी आपल्या कमाईचा मोठा भाग टर्म डिपॉझिट्स आणि बचत खात्यांमध्ये जमा केला आहे.


३० जून पर्यंत मोदींकडे १ कोटी ७५ लाख ६३ हजार ६१८ रुपये इतकी चल संपत्ती होती. 


त्यांच्याकडे ३० जूनला ३१ हजार ४५० रुपये रोकड होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांच्या चल संपत्तीत २६.२६ टक्के इतकी वाढ झाली आहे. 


या वाढीमागे त्यांच्या वेतनातून झालेली बचत आणि फिक्स्ड डिपॉझिटद्वारे मिळालेल्या व्याजाची पुन्हा बचत करणे ही मुख्य कारणे आहेत.


पंतप्रधान मोदी यांच्या अचल संपत्तीमध्ये विशेष बदल झालेला नाही. ताज्या माहितीनुसार, मोदींच्या नावावर गांधीनगरमध्ये एक घर आहे. 


या घराची किंमत १.१ कोटी रुपये इतकी आहे. या कुटुंबाचा मालकी हक्क मोदी आणि त्यांचे कुटुंबाला आहे. 


मोदींवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच त्यांच्याकडे कार देखील नाही. त्यांच्याकडे सोन्याच्या ४ अंगठ्या आहेत.


मोदींच्या बचत खात्यात ३० जूनला ३.३८ लाख रुपये होते. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) गांधीनगर शाखेत फिक्स्ड डिपॉझिट केले आहे. 


गेल्या वर्षी त्याचे मूल्य १ कोटी २७ लाख, ८१ हजार ५७४ रुपये इतकी होती. 


त्यात ३० जून २०२० मध्ये वाढ होऊन ती १ कोटी ६० लाख २८ हजार ३९ इतकी झाली आहे. 


मोदी यांनी टॅक्स वाचवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. 


त्यांनी लाइफ इन्श्योरन्सव्यतिरिक्त नॅशनल सेव्हिग्ज सर्टिफिकेट (NSCs) आणि इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्समध्ये पैसा गुंतवला आहे. 


त्यांचा वीमा प्रीमियम देखील कमी झाला आहे. मोदी यांच्याकडे ८ लाख ४३ हजार १२४ रुपांचे NSCs आहेत, 


तर वीमा प्रीमियम १ लाख ५० हजार ९५७ रुपये इचका जातो. 


जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी २० हजार रुपयांचा इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड खरेदी केला होता. हा अद्याप मॅच्युअर झालेला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post