मनसे - शिवसेनेत जवळीक वाढत आहे का?

file photo


वेब टीम : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन यामुळे निर्माण झालेल्या वादावर मनसेने पहिल्यांदाच  भूमिका मांडली . 


जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेनेही बॉलिवूड ड्रग्ज वादात उडी घेतली आहे. 


अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून तंत्रज्ञ आणि कलाकारांना धीर दिला आहे.


उद्धव ठाकरेंच्या मुद्द्याला पाठिंबा दिल्याने आता शिवसेना-मनसे यांच्यात जवळीक वाढत आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.


“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. 


तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही; 


कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे 


आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे. ” अशी हमी खोपकर यांनी ट्विटरवरून दिली.


“भूतकाळातही बॉलिवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या; 


पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. 


आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. 


एवढंच नाही, तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे.” असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post