अभिनेता रितेश देशमुखचा रियाला 'सपोर्ट'... म्हणाला...वेब टीम : मुंबई

सुशांतसिंग राजपुत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. 


त्यानंतर महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच रियाची सशर्त जामिनावर सुटका झाली आहे. 


रियाच्या सुटकेनंतर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्यात. 


त्यातच आता अभिनेता रितेस देशमुख यानेही रियासाठी एक ट्विट केले आहे.


रिया जामीनावर सुटल्यानंतर कालच तिने तिची शेजारीण डिंपल थवानीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवसआधी म्हणजे, 13 तारखेला तो व रिया सोबत होते, आपण त्यांना एकत्र पाहिले होते, असा दावा डिंपलने केला होता. 


मात्र सीबीआयसमोर डिंपल या दाव्यावरून पलटली आणि रियाने खोटा दावा करणा-या डिंपलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 


डिंपलने आपल्यावर खोटे आरोप करत, प्रकरणाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, असे रियाने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.


रिया चक्रवर्तीने शेजारी महिलेविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रितेशने ही प्रतिक्रिया दिली आहे.


‘तुला लढण्याचे बळ मिळो रिया.सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही,’ असे ट्विट रितेशने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post