वेब टीम : किव ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूंचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ उडली होती. मात्र, युक्रेनमध्ये कोरोना विषाणूंचे पाच प्रकार आढळल...
वेब टीम : किव
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूंचा नवा प्रकार आढळल्याने जगभरात खळबळ उडली होती.
मात्र, युक्रेनमध्ये कोरोना विषाणूंचे पाच प्रकार आढळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. युक्रेनमधील नऊ भागातून जमा केलेल्या जवळपास 50 नमुन्यांच्या तपासणीत ही बाब समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती युक्रेन सरकारला दिली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनमधील पाचही विषाणू चीनमधील विषाणूसारखे आहे.
युक्रेनमध्ये आढळलेले नवीन विषाणू बी 1; बी 1.1; बी 1.1.1; व्ही 1.5 आणि व्ही 2 असे आहेत.
COMMENTS