पत्रकार तरुणीचा कान्हूर पठार- टाकळीढोकेश्वर रस्त्यावर डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू पारनेर/प्रतिनिधी : कान्हूर पठार टाकळी ढोकेश्वर रस्त...
पत्रकार तरुणीचा कान्हूर पठार- टाकळीढोकेश्वर रस्त्यावर डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू
पारनेर/प्रतिनिधी :
कान्हूर पठार टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोराची धडक दिल्याने संपदा सुरेश साळवे (वय २६) या पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कान्हूर पठार येथून वाळू वाहतूक करणारा मोकळा डंपर भारधाव वेगाने चालला होता. टाकळी ढोकेश्वर घाटात समोरून येणाऱ्या स्कुटीला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोराची धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार समोरून दुचाकी आल्याचे चालकाच्या लक्षात आले, मात्र वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने डंपरने जोराची धडक दिली त्यात पत्रकार तरुणीचा मृत्यू झाला.
COMMENTS