संसारात राहूनही घेतला पारमार्थिक जीवनाचा आनंद ------------ अध्यात्मिक विचारांचे ह. भ. प. दत्तात्रय महाराज राऊत काळाच्या पडद्याआड पारनेर :...
संसारात राहूनही घेतला पारमार्थिक जीवनाचा आनंद
------------
अध्यात्मिक विचारांचे ह. भ. प. दत्तात्रय महाराज राऊत काळाच्या पडद्याआड
पारनेर :
वासुंदे गावचे सुपुत्र, तालुक्याचे भुषण, पंढरीच्या पांडुरंगावर निस्सीम श्रद्धा असणारे, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक वारकरी संप्रादायाची पताका ज्यांनी आयुष्यभर आपल्या खांद्यावर धारण केली, असे ह.भ.प. दत्तात्रय महारात राऊत यांनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्या निवासस्थानी वयाच्या ८४ व्या वर्षी इहलोकीचा निरोप घेतला. त्यांच्या गमनाने सारा गाव अतिशय हळहळला. सर्वत्र शोककळा पसरली.
त्यांच्या अंत्यदर्शनासाटी लोकांची रिघ लागली. स्व. ह. भ. प. पंडित महाराज उमरेकर यांच्या प्रेरणेने राऊत महाराज भजन, किर्तन, प्रवचनाकडे आकृष्ट झाले. ज्ञानेश्वरी, अभंगांच्या गाया, अमृतानुभव, भागवत, रामायण, महाभारत आदि ग्रंथांचे वाचन व पारायणे चालू झाली. ज्ञानेश्वरी व अभंगाच्या गाथा यांची राऊत महाराजांनी शेकडो पारायणे केली. विठ्ठलावरील व ज्ञानेश्वर माऊलींवरील श्रद्धेमुळे त्यांनी अध्यात्मिक व धार्मिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. गावातील भाऊसाहेब महाराज मंदिरात ह भ प रमेश महाराज कुलकर्णी व ह भ प धनंजय महाराज उदावंत राऊत महाराज यांनी हरीपाठ, गुरुवारचे भजन, एकादशीला कीर्तन, पहाटे काकड्याचे भजन, कार्तिक स्नान, गोपाळकाला अशा अनेक परंपरा निर्माण केल्या.
दरवर्षी संपन्न होणान्या भाऊसाहेब महाराजांच्या सप्ताहाचे व इतरही धार्मिक कार्याचे ते मार्गदर्शक होते... भजन, किर्तनाचा त्यांना कधीच कंटाळा आला नाही. ते हरीनामाचा 'रामकृष्ण हरी चा जप करण्यात सदैव दंग होते.
१२ वर्षाहून दरवर्षी क्षेत्र वासुंदे ते श्रीक्षेत्र (चैत्रीवारी), आळंदी, पिंपळनेर, तहाराबाद, ढोकेश्वर ( महाशिवरात्र) आदी पायीदिंडी सोहळे आयोजित केले. प्रपंचात राहूनही परमार्थ कसा करता येतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राऊत महाराजांचे जीवन चरित्र होय. त्यांचा आदर्श समोर ठेवावा व आपले हित साध्य करावा. हीच त्यांना श्रद्धांजली. पुन्हा ह.भ.प. राऊत महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन : रामचंद्र झावरे सर, माजी मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश वासुदे, ता. पारनेर.