टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम वर दोन भावांनी मारला डल्ला वडगाव सावताळ येथील एकास अटक; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पारनेर/प्रतिनिधी : टा...
टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम वर दोन भावांनी मारला डल्ला
वडगाव सावताळ येथील एकास अटक; मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
पारनेर/प्रतिनिधी :
टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य व भरवस्तीत असणारे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला होता. त्यानुसार तपासाची सुत्रे फिरली असता वडगाव सावताळ येथील एकाच कुटुंबातील दोघांची ही करामत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात ठिकठिकाणी एटीएम फोडण्याचे प्रकार वाढले असून, यातील टोळी या तपास तून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील एटीएम फोडी प्रकरणी वडगाव सावताळ येथील संदीप सुरेश रोकडे याला ताब्यात घेण्यात आले.
आहे. त्याचा भाऊ विकास सुरेश रोकडे फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी जिसीय एटीएम फोडी
प्रकरणी त्यांच्या ताब्यातील पिकअप ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये ढोकी, टाकळी ढोकेश्वर व वडगाव सावताळ येथील अजून काही तरुणांचा सामावेश असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
एटीएम सीसीटीव्हीमध्ये पीकअप गाडीसह तीन चोरटे कैद झाले होते. त्यामुळे पारनेर पोलिसांनी पीकअप गाडीच्या आधारे तपासाची सूत्रे फिरवली.
वडगाव सावताळ रोकडे कुटुंबातील 'बड़े मियाँ, छोटे मियाँ चा सामावेश आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस उपअधिक्षक प्रांजली सोनवणे व पो लीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी भेट दिली असून स्क्रु ड्रायव्हर व इतर हाताळलेल्या वस्तुंवरील ठसे घेण्यात आले आहेत. बुधवारी रात्री दोन वाजता टाकळी ढोकेश्वर येथील भारतीय स्टेट बँकेच्या जवळच असणारा या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. पिकअपला रोप वे बांधून एटीएमचा वरचा भाग ओढून घेण्याचा प्रयत्न झाला. या चोरीत रोख रक्कम चोरीला गेली नव्हती. मात्र हा प्रकार करताना सीसीटीव्हीमध्ये तिघे कैद झाले होते. काळ्या कागदाच्या सहाय्याने एटीएमचा काही भाग व गाडीचा नंबर झाकण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. या एटीएम प्रकरणी दोन जण ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
....
COMMENTS