आमदार निलेश लंके यांना कार्यकर्त्याचे भावनिक पत्र प्रिय आमदार निलेश लंके, माझे नेते, नेते,रोज काही ना काही तुमच्याबद्दल कानावर येतंय. कधी कर...
आमदार निलेश लंके यांना कार्यकर्त्याचे भावनिक पत्र
प्रिय आमदार निलेश लंके,
माझे नेते,
नेते,रोज काही ना काही तुमच्याबद्दल कानावर येतंय. कधी कर्मचाऱ्याला मारहाण,कधी देवरे मॅडम ची व्हिडीओ क्लिप,कधी अब्रूनुकसानीचा दावा तर कधी दमदाटी. हे सगळं चूक आहे की बरोबर,खरं आहे की खोटं मला काहीही माहीत नाही.या सर्व गोष्टीच्या खोलात पडण्याइतका मोठा नाही.किंबहुना माझी बौद्धिक पातळी तितकी मजबूत नाही. मात्र हे सर्व योग्य नाही.कोणत्याही वाईट आणि वादग्रस्त गोष्टीत तुमचे नाव येऊ नये अशी माझी रोज अपेक्षा असते.मी देवाला रोज प्रार्थना करतो की माझ्या नेत्याला सुखात ठेव,त्यांना सुखाची झोप येऊ दे.मात्र तसे अजिबात घडत नाही.दर पंधरा दिवसाला काहीतरी नवीन प्रकरण कानावर येत आहे.
काम करणाऱ्या माणसाकडून चुका घडतात.जो माणूस कामच करत नाही,तो चुकूच शकत नाही.त्यामुळे त्या तुमच्याकडून घडणे अपेक्षितच आहे.मात्र हे सर्व अशा पद्धतीने घडत आहे,की ज्याची मला अजिबात अपेक्षा नाही.जीव तुटतो ओ तुमच्यासाठी.कारण तुम्ही जीव लावलाय तेव्हडा.आपली महिना-महिना भेट होत नाही,पण तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस नाही.पत्र लिहताना मी लहान तोंडी मोठा घास घेतोय.मला तुम्हाला सल्ला देण्याचा अधिकार नाही किंवा तेव्हडी माझी पात्रता देखील नाही.मात्र आता हे सर्व थांबवा.देवरे मॅडम महिला आहे म्हणून त्यांचा सन्मान करा.माझ्या नेत्याच्या राज्यात एखादी महिला अधिकारी आत्महत्येची तयारी करत असेल तर हे माझ्याही मनाला पटत नाही.
मी जेव्हा जिल्ह्याबाहेर जातो तेव्हा कोणी गाव विचारलं तर देहरे सांगतो. मात्र देहरे कुठे आहे,हे समोरच्याला समजत नाही.तेव्हा मी सांगतो ” मी निलेश लंके च्या मतदार संघातला आहे ” लगेच त्यांना ओळख पटते. ही आहे तुमची नेता म्हणून ताकत. माझ्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा तुम्ही आधार आणि ओळख आहात. एखानदा आमदार हा मतदार संघात प्रसिद्ध असतो, मात्र तुम्ही देशपातळीवर प्रसिद्ध झालात. तुमचं काम आणि कामाचा झपाटा बोलतो.पण अशा बातम्या वाचल्या की मन खिन्न होत. नेमकं तुमचं चुकतंय की समोरच्याच हे कळत नाही.पण अस व्हायला नको,तुमचे विकासकामं,मदत,दानधर्म सोडून दुसऱ्या कोणत्याही बातम्या ऐकायची आणि वाचायची सवय नाही राहिली ओ आता.तुमची बदनामी सहन होत नाही मला.कारण अशा गोष्टीची मला सवय नाही.
या पत्राच्या माध्यमातून देवरे मॅडम मी तुम्हाला ही विनंती करतो,तुम्ही देखील थोडं समजून घ्या.आमचा नेता तसा नाही मॅडम.काही चुका घडल्या असतील नेत्याकडून तर तुम्ही मोठं मन दाखवा.माझ्या नेत्याच्या मतदारसंघात महिला अधिकारी आत्महत्येची भाषा बोलत असेल तर त्याचं मलाही दुःख आहे. तुम्ही कोरोना काळात आमच्या नेत्याच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे,तुमचे कष्ट आम्ही कोणीही विसरलो नाहीत.नेते,माझ्या भावना समजून घ्या.मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा,मात्र हे आता सहन होत नाही.तुम्हाला समोर बोलायची डेअरिंग होत नाही,म्हणून पत्र पाठवत आहे.
सदैव तुमचा,
नवनाथ (भोला)लांडगे
देहरे, 7028148245
COMMENTS