बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्थेत गोळीबार करून लूट करणारा अद्याप फरारच पतसंस्थेच्या जखमी व्यवस्थापकाच्या प्रकृतीत सुधारणा पारनेर/प्...
बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्थेत गोळीबार करून लूट करणारा अद्याप फरारच
पतसंस्थेच्या जखमी व्यवस्थापकाच्या प्रकृतीत सुधारणा
पारनेर/प्रतिनिधी : बेलवंडी फाटा येथे शनिवारी (दि.७) दुपारी पारनेर ग्रामीण पतसंस्थेत लुटमार करणाऱ्या लुटारुचा अद्याप तपास लागलेला नाही. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेत गोळी लागून जखमी झालेल्या शाखा व्यावस्थापकाच्या पोटातील गोळी काढण्यात आली असून त्याची प्रकृती सुधारते आहे.
पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेत शनिवारी भर दुपारी एका व्यक्तीने गोळीबार करत पतसंस्थेतील पाच लाख २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पळून जाताना शाखाधिकारी सोनवणे यांनी विरोध केला असता त्या लुटारुने शाखाधिकाऱ्यांवर गोळी झाडली. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू आहेत.
डॉक्टरांनी त्याच्या पोटातील गोळी काढली आहे. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक काशीनाथ दाते यांनी दिली. • लुटमार होण्याचा काही वेळ अगोदरच एका कर्जदाराने पाच लाखांचा भरणा केला होता. तेव्हा त्या लुटारुला याविषयी काही माहिती मिळाली होती. काय असा संशय असल्याचे दाते यांनी सांगितले..
लुटारुच्या शोधार्थ सुपा पोलिसांनी काही पथके बनवली असून ते शिरूर, कुरूंद, कोहकडी, जवळा निघोज आदी भागांत शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक डॉ. गोकावे करत आहेत. भरदिवसा वर्दळीच्या .ठिकाणी ऐन दुपारी गोळीबार करून पतसंस्था लुटल्याने संस्थाचालक व व्यापारी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. अशा भामट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी, अशी नागरिकाची मागणी आहे.
COMMENTS