जवळ्यातील खून खटल्याचा तपास सीआयडीने करावा तपासात प्रगती नाही, ग्रामस्थांची मागणी पारनेर प्रतिनिधी जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार क...
जवळ्यातील खून खटल्याचा तपास सीआयडीने करावा
तपासात प्रगती नाही, ग्रामस्थांची मागणी
पारनेर प्रतिनिधी
जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीचा खून झाल्याच्या घटनेचा तपास पोलिसांकडून काढून तो आता सीआडी कडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे . अल्पवयीन शाळकरी मुलीच्या खून झाल्याच्या घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले तरी पोलिसांच्या तपासात प्रगती नसल्यामुळे ही मागणी जवळ्यातील ग्रामस्थांनी दशक्रिया विधी प्रसंगी प्रशासनाकडे केली आहे.
या घटनेनंतर गेल्या दहा दिवसांत पोलिसांनी गावातील पंचवीस ते तीस जणांना संशयित म्हणून तपासले असून त्यांच्याकडून काहीही महत्त्वाचे धागेदोरे अद्याप मिळाले नाहीत अशी माहिती समोर आली आहे . अज्ञात आरोपी कडून भरदिवसा या शाळकरी बालिकेचा निर्घुन खून झाल्यामुळे जवळा ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन पुकारले होते . परंतु पोलिसांनी तपासाला वेळ लागत आहे घटनेला साक्षीदार असुन कोणीही पुढे येत नाही , ज्यांना तपासले ते वारंवार जबाब बदलत आहेत ,असे आमच्या तपासात निष्पन्न होत आहे , त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारेच तपास चालू आहे . असे पोलिसांकडून सांगण्यात येते . या घटनेला पोलिसांनी गार्भीयाने घेतले आहे . वरीष्ठ अधिकारी तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यांनी वारंवार घटना स्थळी भेटी दिल्या आहेत .
या घटनेत बालिकेचा अत्याचार करून खून करण्यात आलेला आहे व तसा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला आहे . परंतु झालेले अत्याचार व त्याबाबतची माहिती न्याय वैद्यकीय तपासणी अहवालानंतर निष्पन्न होणार आहे . अत्याचार झालेला असल्याचे गृहीत धरून मयत बालिकेच्या घरी जाणे-येणे असणारे व घराशेजारी राहणारे दहा ते बारा संशयितांच्या जनुकीय (डीएनए ) तपासनीसाठी नमुने पाठवण्यात आलेले आहेत . विषेश बाब म्हणून लवकरात लवकर तो अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे पोलिसांनी ग्रामस्थांना काल सांगीतले आहे . मयत मुलीच्या अंगावरील पुराव्यांचे नमुने संशयितांशी जुळले तर आरोपी लवकर निष्पन्न होईल .अशी अपेक्षा पोलिसांना आहे .
जवळा ग्रामस्थांनी या घटनेचा तपास लागत नाही म्हणून सार्वजनिक ठिकाणी दशक्रियाविधी करून उपोषण चालू करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता , त्या बाबतची पुर्ण तयारीही केली होती ,परंतु पोलिसांकडून सांगण्यात आले की न्याय वैद्यकीय अहवालानंतर लगेच आम्ही आरोपी पर्यंत पोहचु , तोपर्यंत आम्हाला वेळ देण्याची विनंती करण्यात आली त्यानंतर जवळे ग्रामस्थांनी विचारविनीमय करून जाहीर केलेले उपोषण काही दिवसांसाठी तात्पुरते पुढे ढकलले आहे . दशक्रिया विधिवेळी अनेक महीला ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला . तर काहींना अश्रू अनावर झाले होते .
आरोपींनी शोधाण्यासाठी सर्वतोपरी ग्रामस्त मदत करू . ग्रामस्थांनी पुकारलेले उपोषण तात्पुरते पुढे ढकलले आहे . आमचा संमय व सहनशीलता केव्हाही संपुन तीव्र आंदोलन उभे राहु शकते .
- सौ अनिता आढाव
सरपंच जवळा .
- सौ. रंजना पठारे
सा .कार्यकर्त्या
नार्को व सीआडी तपास करा ...
पोलिसांना या गुन्ह्याचा तपास आव्हान ठरत आहे तर , मग या गंभीर गुन्हाची उकल होण्यासाठी
आता हा तपास सीआयडी ने करावा .
संशयीत वारंवार जबाब बदलून तपासाची दिशा बदलवू पाहत असतील तर त्यांची नार्को तपासणी केलीच पाहीजे परंतु या गुन्ह्याची उकल झालीच पाहीजे .
- बबनराव सालके
- रामदास घावटे
ग्रामस्त जवळा
COMMENTS