जवळ्याच्या पीडीतेच्या न्यायालयाचा खर्च सामाजिक न्याय विभाग करणार उज्वल निकम, उमेश यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीसाठीही पुढाका...
जवळ्याच्या पीडीतेच्या न्यायालयाचा खर्च सामाजिक न्याय विभाग करणार
उज्वल निकम, उमेश यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीसाठीही पुढाकार घेणार
पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागामार्फत आमदार नीलेश लंके मार्गदर्शनाखाली जवळ्याच्या पीडीतेच्या न्यायालयाचा संपूर्ण खर्च करण्यात येणार आहे. विभागाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरगे, तसेच जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी बुधवारी पीडीतेच्या कुटूंंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
पीडीतेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे, जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा यासाठीही सामाजिक न्याय विभागामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. रेखा जरे हत्याकांडाचे काम पाहणारे अॅड. सचिन पटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या खटल्याचे कामकाज पाहिले जाईल.अॅड. पटेकर हे देखील या खटल्याचे काम मोफत पाहणार आहेत.
पीडीत कुटूंबाचे सांत्वन करताना तुषार बोरगे यांच्यासह सुरज खरात, रोहन बोरगे, इसाक शेख, अमोल सोनवणे, योगेश वाघमारे, संजय सोनवणे, अमोल सातपुते, नितिन साळवे, अतुल भंडलकर, नितिन मुरकुुटे, आकाश गायकवाड, शैलेश रोकडे, रामदास साळवे, प्रवीण साळवे, शशिकांत कनिंग्धज, तेजस आवचार आदी उपस्थित होते.