अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्यांची सखोल चौकशी करा : संभाजी रोहोकले अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन..! पारनेर...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्यांची सखोल चौकशी करा : संभाजी रोहोकले
अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर आंदोलन..!
पारनेर : जवळे गावातील शाळकरी मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्तेप्रकरणी घटनेचे पारनेर तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र पडसाद उमटले असून सदर घटणेबाबत जनतेच्या मनात तीव्र संताप आहे सदरची घटना ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर घाला घालणारी आहे त्यामुळे सदर घटनेतील पीडितेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या नराधम आरोपीनं विरुद्ध कठोरत कठोर कारवाई व्हावी अन्यथा आरोपीस कायद्याची भीती व धाक राहणार नाही तसेच आरोपीचे गुन्हे करण्याचे मनोद्धार्य वाढेल.
त्यामुळे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीस लवकरात लवकर अटक व्हावी आरोपिंचा तपास न लागल्यास काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अशी माहिती काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष संभाजी राव रोहकले यांनी दिली. काँग्रेस कमिटी पारनेर तालुका आज पीडित कुटुंबाला भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच पारनेर पोलीस स्टेशनं यांना निवेदन देण्यात आले. या बहिणीला न्याय मिळेपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस पक्ष त्या कुटुंबासोबत असेल.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग तालुका अध्यक्ष अक्षराज गायकवाड, तालुका सचिव रामकृष्ण पवार, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव पठारे, महिला काँग्रेस
तालुका मनीषा ताई ठुबे, महिला काँग्रेस शहर अनिता ताई डेंगळे काँग्रेस सांस्कृतिक सेल तालुका अध्यक्ष सचिन लव्हांडे, अनु. जाती सरचिटणीस मंगेश गरुड, अनु. जाती.
सचिव बाबाजी सोनवणे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष शब्बीर भाई इनामदार, सागर लंके, जिल्हा काँग्रेस सदस्य किसनराव धुमाळ, समीर काळे सर, सीताराम देठे (आत्मा कमिटी अध्यक्ष) अनिल लंके अध्यक्ष सेवा दल, काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप मदगे, रमेश सालके, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS