नगर :- बालगायक व वादकांना भजनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळून त्यांच्यात अध्यात्मिक सद्भावानांची पेरणी व्हावी या उद्देशाने श्री.सत्यसाई से...
नगर :-
बालगायक व वादकांना भजनाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळून त्यांच्यात अध्यात्मिक सद्भावानांची पेरणी व्हावी या उद्देशाने श्री.सत्यसाई सेवा संघटनेच्या नगर शाखेच्यावतीने दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय बालभजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे संयोजक अशोक कुरापाटी यांनी दिली.
राज्यस्तरीय महोत्सवाचे हे १२ वे वर्ष आहे. या महोत्सवासाठी वय वर्षे पाच ते दहा व अकरा ते सोळा अशा दोन गटातून बालकांचा सहभाग अपेक्षित आहे. सहभागी बालकांनी फक्त
सत्यसाईबाबांची भजने समूह (कोरस) स्वरुपात सादर करावयाची आहे. व्यक्तीगत स्वरूपात व बालवाद्यवृंदाना विविध ताल-वाद्य स्वरात भजन सादर करता येईल. समुह भजन गायनात मुख्य गायक व किमान ५ जणांचा सहगायकांचा ग्रुप असावा. सत्यसाईबाबांची भजने www.radiosai.org या संकेतस्थळावर व युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत.
सहभागी ग्रुपला किमान ३ भजन सादर करण्याची तयारी करावी लागेल. त्यापैकी एकच भजन मुख्य संयोजक सुचवतील ते मुख्य सोहळयात सादर करावयाचे आहे. त्यासाठी ३ मिनीटाचा अवधी राहील. सहभागी बालकांच्या ग्रुपने आपापल्या साथसंगत व वाद्याची व्यवस्था करावयाची आहे. सहभागी बालगायक, वादकांचा मुख्य सोहळयात स्मृतीचिन्ह, सन्मानपत्राने गौरव होणार आहे.
पोस्टकार्डच्या आकाराच्या ग्रुप (समूह) फोटोसह विहीत अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २ जानेवारी आहे. अधिक तपशीलासाठी मोबाईल ९८९०६९७५९३ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीतजास्त बालकांनी या राज्यस्तरीय भजन मोहत्स्वात सहभागी व्हावे, आवाहन संयोजक अशोक कुरापाटी यांनी केले आहे.
COMMENTS