नगर- अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त तन्जिमे उर्दू अदब, अहमदनगरच्या वतीने महफीले गझलचे आयोजन...
नगर-
अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त तन्जिमे उर्दू अदब, अहमदनगरच्या वतीने महफीले गझलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तंन्जिमे उर्दू अदबचे अध्यक्ष व अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद खालील यांनी दिली आहे.
किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने शहरामध्ये दहा दिवसांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री ना. सुनील केदार यांनी या फेस्टिव्हलचे ८ नोव्हेंबर रोजी उद्घाटन केले आहे.
या फेस्टिव्हल अंतर्गत तन्जिमे उर्दू अदबच्या वतीने रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजता सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृह येथे महफीले गझलचे आयोजन करण्यात आले आहे. या गझल गायकीच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझल गायक डॉ. दोस्त मोहम्मद खान व त्यांचे सहकारी गझल गायन प्रस्तुत करणार असल्याचे निसार बागवान यांनी सांगीतले.
हा कार्यक्रम सर्व रसिक नागरिकांसाठी खुला असून सर्वांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. तरी या गझलच्या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS