नगर- भारतरत्न स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कौमी एकत...
नगर-
भारतरत्न स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कौमी एकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अल करम हाॅस्पिटलच्या वतीने बुधराणी हाॅस्पिटल पुणे व मुकुंदनगर येथील अल नुर आय क्लिनिकच्या सहकार्याने रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत रामचंद्र खुंट येथील अल करम मॅटर्निटी हॉस्पिटल किंग्जगेटरोड इंगळे मेडिकल च्या मागे अहमदनगर येथे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.असे मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी कळविले आहे.
तरी या संधीचा गरजूंनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा व अधिक माहितीसाठी तौफिक तांबोळी यांच्याशी 98 60 70 80 16 या नंबर वर संपर्क करुन किंवा समक्ष नांव नोंदणी करावी.
COMMENTS