अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादी...
अहमदनगर (प्रतिनिधी)-
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, नाथा राऊत, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे अमित खामकर, रावसाहेब झावरे, रमेश वराडे, दिपक बडदे, दिलीप ठोकळ मेजर, सुंदरराव पाटील, शुभम भंडारी, केशव रासकर, सदाशिव मांढरे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मोठे योगदान दिले. त्यांना बालके प्रिय असल्याने त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. ज्या ठिकाणी या महापुरुषाचा पुतळा आहे, त्या परिसराची मोठी दुरावस्था झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
संजय सपकाळ म्हणाले की, सक्षम भारताची मुहुर्तमेढ पंडित जवाहरलाल नेहरु यांनी रोवली. त्यांनी दूरदृष्टी ठेऊन भारताला विकासाच्या दिशेने नेले. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज भारताची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सर्वत्र अंधकार, अनागोंदी व हुकुमशाही पसरली असून, आज पंडित नेहरुंचे कार्य अधोरेखित होत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये पंडित नेहरुंचे कार्य व राष्ट्रप्रेम प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------
पंडित जवाहरलाल नेहरुंच्या जयंती दिनी भुईकोट किल्ल्यातील त्यांचे बंदिवानगृह नागरिकांसाठी बंद
भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भुईकोट किल्ला येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या बंदिवानगृहात अभिवादनसाठी गेले असता, लष्कराच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने भुईकोट किल्ल्यात जाण्यास त्यांना रोखण्यात आले. या गोष्टीचा खेद व्यक्त करुन पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनी बंदिवानगृह नागरिकांना पाहण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्याकरिता खुला ठेवण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.