नगर - रोटरी क्लब अहमदनगर शाखेच्या वतीने दिपावली निमित्त सामाजिक जाणीवेतून रोटरी क्लबच्या एमआयडीसी मधील ‘रोटरी निवारा’ या वसाहती मधील दिव्या...
नगर -
रोटरी क्लब अहमदनगर शाखेच्या वतीने दिपावली निमित्त सामाजिक जाणीवेतून रोटरी क्लबच्या एमआयडीसी मधील ‘रोटरी निवारा’ या वसाहती मधील दिव्यांग नागरिकांना दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत बोगावत, सचिव पुरुषोत्तम जाधाव, डॉ.प्रकाश कांकरिया, अॅड. अमित बोरकर, डॉ.सुधा कांकरिया, निलेश वैकर, दादासाहेब करंजुले, महेश गोपाळकृष्णन, भक्ती बोगावत, पंकज खंडेलवाल, विजय बिहाणी, रवी राउत, सोनावणे, राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नगर शाखेचे अध्यक्ष संभाजी भोर आदींसह रोटरी निवारा वसाहती मधील नागरीक उपस्थित होते.
प्रशांत बोगावत म्हणाले, नगरच्या रोटरी क्लबच्या वतीने एमआयडीसी मध्ये दिव्यांग बांधवांसाठी उभारलेला रोटरी निवारा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. रोटरी क्लब वर्षभर येथील कुटुंबियांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. इतर घटकांना सामावून घेत रोटरी परिवार कायम आपला आनंद द्विगुणित करत आहे.
प्रास्ताविकात पुरुषोत्तम जाधव म्हणाले, येथील नागरिक जरी शरीराने अंध असले तरी मनाने व विचाराने जागरूक व डोळस आहेत. रोटरी निवारा मधील सर्व बंधू भगिनी हे रोटरी परिवाराचे घटक आहेत. त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.दादासाहेब करंजुले यांनी मानले.