नगर - जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्हा अल्पसंख्यांक संघटनेच्यावतीने या शाळांत विविध उपक्रम राबवून विद्या...
नगर -
जिल्ह्यात अल्पसंख्याक शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्हा अल्पसंख्यांक संघटनेच्यावतीने या शाळांत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्यात येत असतो. त्यासाठी संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील असतात. परंतु तेथील शिक्षक, विद्यार्थी यांच्याही अनेक अडचणी आहेत, त्याबाबत संघटनेच्यावतीने वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. अनेक प्रश्न सुटलेही आहेत. आता आपणही जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्याल, अशी अपेक्षा, अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्हा अल्पसंख्यांक संघटनेच्यावतीने नूतन प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक नौशाद सय्यद, सईद शेख, जमीर शेख आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शिक्षण विभागातील शाळांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा आपला मानस असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधणार आहोत. त्याचप्रमाणे शासनाच्या योजनांचा लाभ शाळा व विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. अल्पसंख्याक शाळांबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी प्रास्तविक केले तर जमीर शेख यांनी आभार मानले