नगर- उर्दू साहित्यिकांनी नियमित वेगवेगळे विषय घेऊन आपली शायरी केलेली आहे व त्या विषयाचे गांभीर्य लोकांसमोर मांडले आहे. पण डॉ.अल्लामा इक्बा...
नगर-
उर्दू साहित्यिकांनी नियमित वेगवेगळे विषय घेऊन आपली शायरी केलेली आहे व त्या विषयाचे गांभीर्य लोकांसमोर मांडले आहे. पण डॉ.अल्लामा इक्बाल यांनी आपल्या प्रत्येक रचनांमधून समाजाच्या व विशेष करून युवकांसाठी प्रोत्साहनात्मक शायरी सादर करून जनजागृती केली आहे. असे प्रतिपादन पुणे कॉलेजचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. मोहम्मद शाकीर शेख यांनी केले.
मखदूम सोसायटीच्या वतीने स्वतंत्र सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यामध्ये डॉ.अल्लामा इक्बाल यांच्या जन्मदिनी जागतिक उर्दु दिन म्हणून साजरा केला जातो. त्या वेळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.शाकीर बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ.अब्दुस सलाम,एस.एम.आय.अयाज शेख, इंजि.इकबाल सैय्यद, डॉ.लियाकत नामोले, डॉ.आसिफ सैय्यद,शम्स खान,रुग्नमित्र नादिर खान आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.शाकीर म्हणाले की डाॅ.ईकबाल यांनी कधीही छंद किंवा लोकांच्या मनोरंजनासाठी शायरी ना करता समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या चुकीच्या बाबींना आपल्या रचनांतून टीका केली व समाजाला जागृत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. कमर सुरूर यांनी मखदुम सोसायटीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.सुत्रसंचालन शफकत सैय्यद यांनी केले. तर आभार आरिफ सैय्यद यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोकांनी हजेरी लावुन उपक्रमाचे कौतुक केले.