वेेेब टीम : उज्जेेन शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात. सांसारिक दुःख हरण करण्यासाठीही महादेवाची पूजा केली जाते. भावपूर्ण आणि मनःपूर्वक श्रद...
वेेेब टीम : उज्जेेन
शिवशंकर हे अत्यंत भोळे मानले जातात. सांसारिक दुःख हरण करण्यासाठीही महादेवाची पूजा केली जाते. भावपूर्ण आणि मनःपूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना केल्यास मनःशांती लाभते आणि व्यवहारातील दोषही दूर होतात.
सुखाचा मार्ग दाखविणा-या या देवाची उपासना करण्याचा शुभ दिन म्हणजे सोमवार. या दिवशी केलेली भोळ्या शंकराची पूजा अनेक मनोकामना पूर्ण करणारी ठरते. त्यासाठी महादेवाच्या पूजा तीन विशेष उपाय आणि शिवमंत्रासोबत पूर्ण केली तर तुमचा भाग्योदय अर्थात मनपसंत जोडीदार, नोकरी, व्यवसायातील प्रगती किंवा तुम्ही केलेल्या संकल्पापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
काय आहेत हे तीन उपाय आणि मंत्र
पहाटे लवकर उठून स्नान आदी कर्म पूर्ण करुन सोमवारी केवळ एकवेळ रात्रीच्या भोजनाचे व्रत करावे. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला जल स्नान करावे. जल स्नान आणि पुढील तीन उपाय करत असतांना खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा.
ऊँ महाशिवाय सोमाय नम:
- स्नान झाल्यानंतर शिवलिंगाला विशेषतः गाईचे दूध अर्पण करावे. यामुळे तन, मन आणि धन यात निर्माण होणा-या कलहांची शांती होईल.
- महादेवाला मधाची धार अर्पण करावी. अशी धारणा आहे की, त्यामुळे आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबधीच्या समस्यांचा अंत होतो.
- त्यानंतर जल स्नान करुन महादेवाला लाल चंदन लावावे किंवा श्रुंगार करावा. चंदनाचा गुणधर्म शितलता हा आहे. त्यामुळे अशी धारणा आहे की, शिवाला चंदन चढविल्याने आयुष्यातही शांती आणि सुख-समृद्धी नांदते.
शिवअराधनेतील या तीन उपायनंतर यथाशक्ती गंध, अक्षता, फुल, नैवेद्य दाखवावा आणि पूजा करावी. यासोबतच शिवलिंगाला अर्पण केलेल्या दूध आणि मधाच्या चरणामृताचा प्रसाद ग्रहण करावा आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी.
COMMENTS