नगर - पाथर्डी, जि.अहमदनगर येथे पाथर्डी ते नगर रोडवर तिलोक विद्यालयासमोर दि.05/06/2017 रोजी संध्याकाळी 8 वा. चे सुमारास फिर्यादी एस.टी.वाह...
नगर -
पाथर्डी, जि.अहमदनगर येथे पाथर्डी ते नगर रोडवर तिलोक विद्यालयासमोर दि.05/06/2017 रोजी संध्याकाळी 8 वा. चे सुमारास फिर्यादी एस.टी.वाहक व साक्षीदार चालक हे त्यांचे ताब्यातील प्रवासी एस.टी.बस पालघर ते पाथर्डी अशी घेऊन जात असतांना आरोपी सनी सुनिल पारखे, रा.माळी बाभुळगांव शिक्षक कॉलनी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर याने नॅशनल हायवे क्र.222 वर त्यांची हुंदाई कार बस समोर उभी केली,
ती बाजूला घे असे वाहकाने सांगितले असता त्याचा राग येऊन आरोपीने एस.टी.बसमध्ये येऊन त्याने वाहकाचे (फिर्यादीचे) अंगातील सरकारी गणवेशाची कॉलरची गचांडी धरुन खाली रोडवर ओढून फिर्यादीस साक्षीदार चालकाचे समक्ष लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली व शासकीय कामा अडथळा आणला म्हणून वाहक फिर्यादी यांचे फिर्यादीहून पाथर्डी पोलिसांनी वरील आरोपीचे विरुद्ध भा.द.वि.क.353, 332, 341, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असता त्यांची चौकशी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात होऊन त्यात वरील आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींतर्फे अॅड.सतीशचंद्र वि.सुद्रिक यांनी काम पाहिले.