--> सकाळी टीव्ही सुरू केला की एक मंत्री खुर्चीवर बसलेला दिसतो ! तो झोपायला घरी जातो की खुर्चीवर झोपतो हे समजत नाही ! | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

सकाळी टीव्ही सुरू केला की एक मंत्री खुर्चीवर बसलेला दिसतो ! तो झोपायला घरी जातो की खुर्चीवर झोपतो हे समजत नाही !

वेब टीम : अहमदनगर राज्यातील सात ते आठ लोकांना टिव्हीवर येण्यास बंदी घातली पाहिजे ! त्यासाठी मीच न्यायालयात जातो असे सांगत महाविकास आघाडी व भ...



वेब टीम : अहमदनगर
राज्यातील सात ते आठ लोकांना टिव्हीवर येण्यास बंदी घातली पाहिजे ! त्यासाठी मीच न्यायालयात जातो असे सांगत महाविकास आघाडी व भाजपामध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी पाथर्डी येथे भाष्य केले. दरम्यान, सात ते आठ लोकांच्या माध्यमातून भाजपातील नेत्यांनाही खा. विखे यांनी अप्रत्यक्ष लक्ष्य केले.

सकाळी उठून टीव्ही सुरू केला की एक मंत्री खुर्चीवर बसलेला दिसतो ! तो झोपायला घरी जातो की खुर्चीवर झोपतो हे समजत नाही ! असे सांगत विखे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलीक यांच्यावर त्यांने नाव न घेता टिकाश्र सोडले. आपण रात्री झोपतो त्यावेळी तो खुर्चीवर असतो, सकाळी टीव्ही लावली तरीही तो खुर्चीवरच दिसतो ! महाराष्ट्रातील या सात आठ लोकांना पाहून घराघरांमध्ये भांडणे सुरू झाली असून त्यांना आत टीव्हीवर येण्यास बंदी घालण्यची गरज आहे. त्यासाठी मीच न्यायालयात जातो असे ते म्हणाले. सकाळी एकाने एक फोटो दाखविला की लगेच दुसरा फोटो दाखवितो. सुदैवाने माझा कोणासोबत फोटो दाखविला नाही ! हे बरं असल्याचेही ते म्हणाले.

पाथर्डीतील विविध विकासकामांचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. त्यावेळी खा. विखे बोलत होते. विखे म्हणाले, अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री असलेल्या नवाब मलीक यांनी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून किती लोकांना रोजगार दिला ? या खात्याच्या किती योजनांचा लाभ अल्पसंख्यांक समाजाला दिला ? याची माहीती द्यायला हवी. ते केवळ बॉम्ब, फटाका फोडण्याची भाषा करीत आहेत. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्याचा हा उदयोग आहे. शेतीमधून किती उत्पन्न मिळू शकते हे मलीक सांगू शकणार नाहीत मात्र गांजाचा भाव ते सांगू शकतात. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी छापे मारले तर गांजा, चरस आफू मिळेल मात्र भाजपा कार्यकर्त्याच्या घरी सोयाबिन, कांदा, तुर ही शेतीउत्पादने सापडतील असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही विखे यांनी लक्ष्य केले. ते म्हणाले, ज्यांच्यावर राज्याची, देशाची जबाबदारी आहे ते महिन्यात तिसऱ्यांदा नगरला आले. ज्या कामाची उदघाटने केली त्यात त्यांचे एक रूपयांचेही योगदान नाही ! महाविकास आघाडीचा एक तरी मंत्री आठवडयात जिल्हयात असतो. भाजपा सरकारने केलेल्या कामांची भुमिपुजने ते करतात असा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: सकाळी टीव्ही सुरू केला की एक मंत्री खुर्चीवर बसलेला दिसतो ! तो झोपायला घरी जातो की खुर्चीवर झोपतो हे समजत नाही !
सकाळी टीव्ही सुरू केला की एक मंत्री खुर्चीवर बसलेला दिसतो ! तो झोपायला घरी जातो की खुर्चीवर झोपतो हे समजत नाही !
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEghU3wTWyixmx47zUHVQPIJCm3h5ZfH7sufOwhc7rLdX6_hEfllDzLVUjhXjnNC4UampNnPDwUgv7UZRvaZHOrrAiB3DhP_a_C2YNUqSp837aCMIjyIbv8mpAyf3H-ZHY9Lhu_95NloznVPLPUbftNz0GrAHjxgV7gDKaUs50Bh--80ZWY26DWiNbUi=w640-h360
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEghU3wTWyixmx47zUHVQPIJCm3h5ZfH7sufOwhc7rLdX6_hEfllDzLVUjhXjnNC4UampNnPDwUgv7UZRvaZHOrrAiB3DhP_a_C2YNUqSp837aCMIjyIbv8mpAyf3H-ZHY9Lhu_95NloznVPLPUbftNz0GrAHjxgV7gDKaUs50Bh--80ZWY26DWiNbUi=s72-w640-c-h360
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/11/Sujay.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/11/Sujay.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content