नगर - विळद घाटातील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांची इन्फोसिस कॉग्निझंट अॅसेंचर कंपनीमध्ये नोकरीसा...
नगर -
विळद घाटातील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांची इन्फोसिस कॉग्निझंट अॅसेंचर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली, असून प्रत्येकी वार्षिक साडेचार लाख रुपयांचे पॅकेज कंपनी देणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देतांना त्यांनी सांगितले की, आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबरोबरच व्यक्तीमत्व विकास, तांत्रिक कौशल्य, संभाषण कौशल्य तसेच त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्नशिल असते. विद्यार्थी देखील चांगला प्रतिसाद देतात. यामुळेच ग्रामीण व शहरी विद्यार्थी येथे शिक्षण पुर्ण करुन नोकरी मिळेल या उद्देशाने प्रयत्न करतात. महाविद्यालयाच्या अनोख्या पॅटर्न म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होताच नोकर्या मिळवून देण्याचे प्रयत्नांना यश येते.
यावर्षी आय.टी.विभागातील विद्यार्थ्यांना पुणे येथील इन्फोसिस, कॉग्निझंट, अॅसेंचर अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. या ऑनलाईन मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात आली. त्यानंतर तांत्रिक चाचणी आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे माहिती तंत्रज्ञान विभागातील भाग्यश्री जाधव, वैष्णवी कल्याणकर, भावना खोमणे, हर्षवर्धिनी माने, आदिती वाकचौरे, आकाश नजन, आकांक्षा गटकळ, रितेश श्रीश्रीमल यांची इन्फोसिस,पुणे या कंपनीमध्ये निवड झाली. तसेच प्रसाद भडके, प्रविण जाधव, यांची कॉग्नीझंट या कंपनीमध्ये निवड झाली. पल्लवी कुमटकर, युक्ती सोळंकी यांची अॅसेंचर,पुणे या कंपनीमध्ये निवड झाली. या विद्यार्थ्यांना सरासरी 4.50 लाख प्रतिवर्ष पॅकेज मिळाले.
महाविद्यालयाच्या डॉ.विखे पाटील फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (टेक्नि) प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य उदय नाईक, विभागप्रमुख डॉ.दीपक विधाते यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. या मुलाखतीच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे यांनी केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन राधाकृष्ण विखे पाटील तसेच संस्थेचे मुख्य कार्य.अधिकारी खा.डॉ.सुजय विखे पा., संस्थेचे सेके्रेटरी डॉ.बी.सदानंदा व डायरेक्टर टेक्नि. पी.एम. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या यशाचे कौतुक केले.
COMMENTS