निघोज गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश लाळगे मंगेश लाळगे समन्वयाची भूमिका ठेवणारे युवा सामाजिक नेतृत्व लाळगे यांची निवड विकासात्मक कामांच...
निघोज गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश लाळगे
मंगेश लाळगे समन्वयाची भूमिका ठेवणारे युवा सामाजिक नेतृत्व
लाळगे यांची निवड विकासात्मक कामांच्या धोरणासाठी योग्य ठरणार
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निघोज गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे सदस्य मंगेश लाळगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मंगेश लाळगे हे निघोज येथे काम करत असताना त्यांनी नेहमी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे. सामाजिक कामाच्या माध्यमातून मंगेश लाळगे हे नेहमी सक्रिय असतात निघोज ची ग्रामपंचायत पारनेर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत आहे. 25 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी मंगेश लाळगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जाणता राजा प्रतिष्ठान, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन माध्यमातून मंगेश लाळगे हे निघोज परिसरामध्ये नेहमीच सामाजिक कामाच्या माध्यमातून सक्रिय असतात. स्व. संदीप पाटील वराळ यांचे खंदे समर्थक असलेले मंगेश लाळगे सचिन पाटील वराळ यांच्या माध्यमातून सध्या निघोज येथे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. नेहमीच समन्वयाची भूमिका घेणारे मंगेश लाळगे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. सचिन पाटील वराळ यांनी त्यांना दिलेली संधी निश्चीतच निघोज गावच्या यापुढील राजकीय सामाजिक समन्वयासाठी योग्य ठरणार आहे.
निघोज गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी मंगेश लाळगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा निघोज ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, निघोज जिल्हा परिषद गटाच्या सदस्या पुष्पाताई संदीप वराळ, निघोज गावच्या ग्रामपंचायत सरपंच चित्राताई वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.