पद्मश्री पोपटराव पवार यांचा पारनेर युवा सेनेच्या वतीने सन्मान पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य ग्रामविकासाला दिशादर्शक : अक्षय गोरडे पारनेर...
पद्मश्री पोपटराव पवार यांचा पारनेर युवा सेनेच्या वतीने सन्मान
पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य ग्रामविकासाला दिशादर्शक : अक्षय गोरडे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्याचे भूषण हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार पद्मश्री पुरस्काराने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित हे आपल्या तालुक्यासाठी नक्कीच अभिमानाचे आहे. हिवरेबाजार सारख्या गावांमध्ये ग्रामविकासाचे पोपटराव पवार यांनी उभे केलेले काम हे नक्कीच आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
पद्मश्री पुरस्काराने पोपटराव पवार यांचा सन्मान झाला त्यानिमित्त पारनेर तालुका युवा सेनेच्या वतीने त्यांचा हिवरेबाजार या ठिकाणी जाऊन युवा सेनेचे पारनेर उपतालुका प्रमुख अमोल ठुबे टाकळी ढोकेश्वर विभागप्रमुख अक्षय गोरडे ,दीपक उंडे,दादाभाऊ शिकारे , ऋषीकेश शिकारे, साई कोरडे, संकेत गोरडे, युवासैनिक पारनेर तालुका,आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी युवकांनी हिवरेबाजार गावच्या विकासासंदर्भात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासोबत चर्चा केली तसेच गावात फिरून गावची पहाणी केली.
पद्मश्री पोपटराव पवार हे आजच्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले ग्रामविकासाचे कार्य आजच्या पिढीला पुढे घेऊन जाईल ग्राम विकासाच्या माध्यमातून आज पोपटराव पवार यांनी समाजाला एक नक्कीच वेगळी दिशा ही दिली आहे.
अक्षय सुनील गोरडे (विभाग प्रमुख युवासेना टाकळी ढोकेश्वर गट)