लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गटात आरोग्य सप्ताह ------ म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे राबविणार उपक्रम ------ निलेश लं...
लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर गटात आरोग्य सप्ताह
------
म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे राबविणार उपक्रम
------
निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्यांना देणार आरोग्यसेवा
----
तालुक्यातील उत्तर भागातील आदिवासी समाजाला होणार मोठा फायदा
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे हे सामाजिक काम करत असून आरोग्यसेवेचे हे काम आमदार निलेश लंके यांची सामाजिक प्रेरणा घेऊन ते करत आहेत. वेळोवेळी आपल्या म्हसोबा झाप, पोखरी, कन्हेर, पळसपुर, काटाळवेढे, कामटवाडी, वारणवाडी, खडकवाडी, पिंपळगाव रोठा, कर्जुले हर्या या परिसरामध्ये ते विविध आरोग्य शिबिरे तसेच सामाजिक उपक्रम राबवत असतात. आदिवासी समाजातील व बहुजन समाजातील सर्वच घटकांपर्यंत सामाजिक मदत पोहोचली पाहिजे ही भूमिका सरपंच प्रकाश गाजरे हे नेहमी घेताना दिसतात. पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार लोकनेते निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा घेऊन ते सध्या टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये मोठे सामाजिक काम करत असून आमदार निलेश लंके करत असलेल्या सामाजिक कामामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची खऱ्या अर्थाने प्रेरणाच मिळत आहे. सरपंच प्रकाश गाजरे यांनी सामाजिक कामांमध्ये आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणेच स्वतःला वाहून घेतले आहे.
टाकळी ढोकेश्वर गटांमध्ये सरपंच प्रकाश गाजरे लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विघ्नहर्ता हॉस्पिटल, पारनेर गिरिराज हॉस्पिटल, बारामती एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी हडपसर, पुणे
यांच्या सहकार्याने टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया, मोफत डोळे तपासणी व मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिर घेत आहेत. हा आरोग्य सप्ताह टाकळी ढोकेश्वर गटातील पुढील गावांमध्ये होणार आहे. पोखरी शनिवार दि. २० नोव्हेंबर २०२१, सावरगाव रविवार दि. २१ नोव्हेंबर २०२१, कर्जुले हर्या, सोमवार दि. २२ नोव्हेंबर २०२१, टाकळी ढोकेश्वर मंगळवार दि. २३ नोव्हेंबर २०२१, खडकवाडी बुधवार दि. २४ नोव्हेंबर २०२१, मांडवे खु. गुरुवार दि. २५ नोव्हेंबर २०२१, वासुंदे शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ पारनेर या ठिकाणी शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोजी अपंग तपासणी शिबिर आणि प्रमाणपत्र वाटप या वेळेमध्ये हे शिबिर संपन्न होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी पोखरी येथे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पारनेर व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे, बाळासाहेब खिलारी, जालिंदर वाबळे, बापू शिर्के, जगदीश गागरे, अंकुश पायमोड, अशोक घुले, बाळासाहेब शिंदे, नामदेव करंजेकर, योगेश पवार, रविंद्र गायखे, भाऊसाहेब कोकाटे, नितीन चिकने, पोपट गुंड, पीयुश गाजरे, सोमनाथ आहेर, ललित गागरे, विशाल गागरे, प्रसाद कर्नावट, अमोल उगले, शंकर कासुटे, संदीप ठाणगे, संभाजी वाळुंज, प्रशांत झावरे, काशिनाथ घुले, पिरताजी घुले, विशाल वाडेकर, सुरेश अडसरे, यांनी दिली आहे.
COMMENTS