गुणोरेमध्ये मोटार पंप चोरांचा सुळसुळाट पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील शेतकरी शरद मुरलीधर गोपाळे यांच्या शेतातल्या विहीर...
गुणोरेमध्ये मोटार पंप चोरांचा सुळसुळाट
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील शेतकरी शरद मुरलीधर गोपाळे यांच्या शेतातल्या विहीरी वरून तीन एचपीची मोटार चोरीला गेली आहे. चोरट्यांनी सदरची मोटार पाण्यातुन वर काढून नटबोल्ट खोलुन व वायर पकडीच्या सहाय्याने कट करून स्टाटरच्या पेटीसह घेऊन गेलेले आहेत.
शरद गोपाळे यांनी नुकतीच नवीन मोटार खरेदी करून सदरच्या विहीरीवर बसवली होती. परंतु चोरट्यांनी एका रात्रीत मोटारीवर डल्ला मारला आणि मोटार गायब केलेली आहे. सदरच्या चोरट्यांची खबर जर कोणी देत असेल तर त्या व्यक्तीस शरद गोपाळे यांच्याकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे आवाहन करण्यात आले आहे.