जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन विकास कामांना गती : सचिन वराळ पाटील निघोज गटात अनेक विकासाची कामे मार्गी पारनेर/प्रतिनिधी : निघ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन विकास कामांना गती : सचिन वराळ पाटील
निघोज गटात अनेक विकासाची कामे मार्गी
पारनेर/प्रतिनिधी :
निघोज - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदिप पाटील वराळ व पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर विकास कामांना गती दिली असल्याचे प्रतिपादन संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक सचिनभाऊ वराळ यांनी गाडीलगाव येथे पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर यांच्या 15 व्या वित्त आयोगातुन बांधलेल्या दशक्रिया विधी बैठक व्यवस्था पत्रा शेडच्या लोकार्पण प्रसंगी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब बढे होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेशदादा बाबर म्हणाले की,डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करताना पाच वर्षापुर्वी पंचायत समिती निवडनुकीत मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जावु न देता खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,जि.प.सदस्या पुष्पाताई संदिप वराळ व संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांच्या सहका-याने निघोज पंचायत समिती गणातील सर्वच गांवाना निधी दिला आहे.
यावेळी सरपंच राधाबाई बाळासाहेब खोसे,उपसरपंच सुभाष गाडीलकर,राळेगण थेरपाळचे माजी सरपंच कैलास ढोमे,निघोज ग्रामपंचायत सदस्य अस्लमभाई इनामदार,सामाजिक कार्यकर्ते रामदास राऊत,डॉ.सुजयदादा विखे पा.युवा मंच कोहकडीचे अध्यक्ष मधुकर चौधरी,गाडीलगाव ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडीलकर,राणीताई,सराफ,रामदास वराळ,पांडूरंग गाडीलकर,सुखदेव गाडीलकर,अमोल गाडीलकर,किरण गाडीलकर,गणेश गाडीलकर,दत्तात्रय गाडीलकर,संतोष गाडीलकर,संतोष जाधव,नाथा व्यवहारे,बाबाजी गाडीलकर यांसह ग्रामस्थ हजर होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार राजेंद्र चत्तर यांनी केले.