वाढदिवस विशेष.. जिवाची बाजी लावणारा साथीदार ! आमदार निलेश लंके यांचे गौरवोद्गार पडद्यामागून सूत्र हलवणारे "कारभारी" पोटघन मेजर यां...
वाढदिवस विशेष..
जिवाची बाजी लावणारा साथीदार !
आमदार निलेश लंके यांचे गौरवोद्गार
पडद्यामागून सूत्र हलवणारे "कारभारी"
पोटघन मेजर यांचा वाढदिवस होणार साध्या पद्धतीने साजरा
मेजर समाजाभिमुख काम करताना प्रसिद्धीपासून दूर
पारनेर प्रतिनिधी :
महत्त्वाची जबाबदारी द्यायची असेल तर पोटघन मेजर शिवाय दुसरं नाव नाही एखादी जबाबदारी दिल्यावर जीवाची बाजी लावायला देखील मागेपुढे पाहत नाही असे गौरवोद्गार नुकत्याच झालेल्या सतीश भालेकर यांच्या वाढदिवस प्रसंगी आमदार निलेश लंके यांनी काढले.
सैन्यदलातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर कारभारी पोटघन हे निलेश लंके प्रतिष्ठान ची जबाबदारी चौख रित्या पार पडत आहेत. आमदार निलेश लंके यांनी दिलेल्या विविध जबाबदाऱ्या निर्भीडपणे पार पाडण्याचे काम त्यांनी केले आहे. अनेक वर्षापासून आमदार लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमदार लंके यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते तालुक्यात परिचित आहेत. एखादी जबाबदारी दिल्यानंतर ती निस्वार्थीपणे पार पाडण्याचे कसब त्यांच्या मध्ये आहे. त्यांची निलेश लंके आमदार होण्या मागे महत्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
तालुक्यातील जातेगाव येथील कारभारी पोटघन हे काही वर्षांपूर्वी देश सेवेतून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी निलेश लंके यांच्या सोबत स्वतःला वाहून घेतले. लंके यांना संघर्षाच्या काळामध्ये सच्च्या भावाप्रमाणे त्यांनी साथ दिली. देशाची सेवा केल्यानंतर समाजकारणांमध्ये लंके यांच्या सोबत त्यांनी समाज सेवा केली. त्यासोबत अनेक मित्र मंडळी कार्यकर्ते जमवले. प्रतिष्ठानमध्ये पोटघन यांना मोठे स्थान आहे. रामायणामध्ये रामासोबत जसे लक्ष्मण उभा असे त्या प्रमाणे त्यांनी वेळोवेळी आमदार लंके यांची साथ दिली. भाळवणी येथील कोरोना सेंटरमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले होते.
भाळवणी येथील कोविड सेंटरची निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन हे सर्व व्यवस्था पाहत. तसेच रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत याप्रसंगी रुग्णांची काळजी घेत असताना कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्यांची स्वच्छता व इतर सर्व गोष्टी पाहत यामुळे परिवाराला कमी वेळ मिळत मात्र पत्नी जया पोटघन घराची व मुलाची सर्व जबाबदारी निभावत असे मेजर रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत असल्याने त्यांना त्या कामांमध्ये वेळ मिळावा म्हणून घरचे सर्व कामे त्या अगदी व्यवस्थित पार पाडत. मात्र त्यांना कोरोना ची लागण झाली त्यांना त्यातून वाचवण्यासाठी पोटघन मेजर सह आमदार निलेश लंके यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र यश आले नाही समाजसेवा करत असताना आपल्या एका मावळ्याला पत्नीला गमवावे लागले. याचे दुःख आमदार निलेश लंके यांना देखील होते.
त्या दुःखातून सावरण्याची व पोटघन मेजर यांना भावाप्रमाणे आधार देण्याचे काम आमदार निलेश लंके यांनी केले. पत्नी गेल्याचे दुःख आपल्या मनात ठेवून पोटघन मेजर पुन्हा दिलेल्या मोहिमेवर रुजू झाले यातच त्यांची आमदार निलेश लंके यांच्या प्रती असणारे जिव्हाळ्याचे संबंध व भावना दिसून येते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर व समाजाभिमुख काम करताना प्रसिद्धीपासून दूर असणारे कारभारी पोटघन मेजर हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना वाढदिवस प्रसंगी शुभेच्छा.
प्रतिष्ठाण'चे 'कारभारी' मात्र बडेजाव नाही !
कारभारी पोटघन हे निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव असून कुठलाही बडेजाव त्यांच्या वागणुकीतून दिसून येत नाही. अत्यंत साधे राहणं व सरळ व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांचे अनेकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आमदार निलेश लंके यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी अतिशय संयम पणे पडद्यामागील भूमिका पार पाडत आपली जबाबदारी चोखपणे निभावली याबाबत आमदार निलेश लंके वेळोवेळी त्यांचे कौतुक करत असतात.
COMMENTS