सर्वसामान्य पारनेरकर करणार हेलिकॉप्टर मध्ये हवाई सफर -- पारनेर सारख्या ग्रामीण भागात अभिनव उपक्रम -- अत्यल्प दरात हेलिकॉप्टर हवाई सफर सेवा ...
सर्वसामान्य पारनेरकर करणार हेलिकॉप्टर मध्ये हवाई सफर
--
पारनेर सारख्या ग्रामीण भागात अभिनव उपक्रम
--
अत्यल्प दरात हेलिकॉप्टर हवाई सफर सेवा उपलब्ध
--
सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे यांनी दिली दिवाळीची अनोखी भेट
--
निसर्ग सौंदर्य, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळ याचे सर्वसामान्य पारनेरकरांना होणार हवाई दर्शन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना या दिवाळीमध्ये वडनेर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे यांनी एक अनोखी भेट देण्याचे ठरविले आहे. त्यांनी आपल्या पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी अगदी अत्यल्प दरामध्ये हेलिकॉप्टर हवाई सफर घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागातील लोकांना हेलिकॉप्टर सफर घडवून आणून त्यांचे हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचे स्वप्न गणेश शेटे हे पूर्ण करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहेत.
अत्यल्प दरामध्ये हेलिकॉप्टर सफर घडवून सर्वसामान्य पारनेरकरांना ते स्वप्नातील इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याची संधी देणार आहेत ते राबवत असलेला हा अभिनव उपक्रम नक्कीच सर्वसामान्य पारनेरकरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा आहे. पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध करून गणेश शेटे पारनेरकरांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये दिवाळीचे औचित्य साधत हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी वर्गाला हेलिकॅप्टर मध्ये हवाई सफर राईड करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी पारनेर मधील अनेक लोक व्यवसाय तसेच नोकरी निमित्त स्थायिक आहेत. दिवाळीचे औचित्य साधत ते दिवाळीच्या सुट्टी निमित्त सर्व आपल्या मूळ गावी पारनेर या ठिकाणी येत असतात. त्यांना सर्वांना आता आपल्या पारनेर सारख्या ग्रामीण भागामध्ये त्यामुळे हेलिकॅप्टर हवाई सफर राईडच्या माध्यमातून एक प्रकारे पर्यटन सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आकाशात भ्रमंती करताना आपल्या पारनेर तालुक्यातील अनेक निसर्ग सौंदर्य तसेच पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र व आपली शेती पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
पारनेर तालुक्यात राबविला जात असलेला हा अत्यल्प दरातील अभिनव उपक्रम निश्चित आदर्शवत असाच आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे हेलिकॉप्टर सफर राईडची सामाजिक संकल्पना अत्यल्प दरात म्हणजे केवळ प्रतिव्यक्ती ४७०० रुपयात सेवा उपलब्ध करून देत आहेत हा उपक्रम दि. ७ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर या दरम्यान पारनेर तालुक्यात राबविला जाणार आहे. ज्यांना या हेलिकॉप्टर सफर राइडचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ९८८१५२३३५२ या मोबाईल नंबरशी संपर्क साधण्याचे आव्हान सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे यांनी केले आहे.
हा हेलिकॉप्टर हवाई राईड चा अभिनव उपक्रम राबवताना एक सामाजिक दायित्व म्हणूनच आम्ही ही सेवा सर्वसामान्य पारनेर करांसाठी उपलब्ध करून देत आहोत असे वडनेर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश शेटे यांनी बोलताना सांगितले.
सर्वसामान्य पारनेरकरांना अत्यल्प दरामध्ये हवाई दर्शन घडविण्याचा संकल्प केला. दिवाळीनिमित्त पारनेर करांना हवाई सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाला हेलिकॉप्टर हवाई सफर आता करता येणार आहे. हा अत्यल्प दरात अभिनव उपक्रम राबवून मी सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न करत आहे.
गणेश शेटे
सामाजिक कार्यकर्ते
COMMENTS