विज पुरवठा सुरळीत न झाल्यास विज वितरण कार्यालयापुढे जागरन गोधळ घालण्याचा मंगेश लाळगे यांचा इशारा पारनेर प्रतिनिधी : विजेचा अनियमित पुरवठा ह...
विज पुरवठा सुरळीत न झाल्यास विज वितरण कार्यालयापुढे जागरन गोधळ घालण्याचा मंगेश लाळगे यांचा इशारा
पारनेर प्रतिनिधी :
विजेचा अनियमित पुरवठा होत असल्याने शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.अधिकारी सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देउन कामांत हलगर्जीपणा करीत असून सध्या कांदा लागवड निघोज परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असून विजेचा अनियमीतपणा शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत असून लवकरात लवकर विजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत न झाल्यास विज वितरण कार्यालयापुढे जागरन गोधळ घालण्याचा इशारा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे मार्गदर्शक मंगेश लाळगे यांनी दिला आहे.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लाळगे यांनी बोलताना दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना लाळगे यांनी सांगितले की गेली अनेक दिवसांपासून विजेचा सावळा गोंधळ सुरू आहे.कितीतरी वेळा संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती सविस्तर दिली आहे.मात्र दखल न घेता अधिकारी मनमानी करीत आहेत.बिल वेळेवर भरुणही निघोज व परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कांदा लागवड सुरू असल्याने शेतकऱ्यांना विजेची नितांत गरज आहे.
शेतकरी बांधवांनी १० ते १५ हजार रूपयांचे कांदा बियाणे खरेदी करुन रोपे तयार केले आहे.परतीच्या पावसाने ही रोपं भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा लाखो रूपयांचा फटका बसला आहे.अशा प्रकारे निघोज व परिसरातील शेतकरी यावर्षी पुर्णपणे तोट्यात असला तरी कांदा लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.कांदा लागवडीसाठी विजेची गरज आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या जाणत्या राजाचे सरकार आहे.याबाबत शेतकरी बिनधास्त आहेत.मात्र विजेचा अनियमीतपणा शेतकऱ्यांच्या गळ्याशी आला आहे.नियमीतपणे विजेची गरज आहे.यासाठी विजेचा पुरवठा सुरळीत न झाल्यास विज कार्यालयापूढे जागरण गोंधळ करण्याचा इशारा लाळगे यांनी दिला आहे.