जवळे प्रकरण : मुलीच्या खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान २० जणांची डीएनए चाचणी, ७० जणांची चौकशी पारनेर प्रतिनिधी : पारनेर जवळे (ता. पारने...
जवळे प्रकरण : मुलीच्या खुनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान
२० जणांची डीएनए चाचणी, ७० जणांची चौकशी
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर जवळे (ता. पारनेर) येथील मुलीवर अत्याचार करून झालेल्या खुनानंतर व अगोदर परिसरात झालेले साडेतीन हजार जणांचे फोन कॉल, संशयित वाटणाऱ्या २० जणांची डीएनए चाचणी, ७० जणांची प्रत्यक्ष व मोबाइल तपासणी, तब्बल सात यंत्रणांचे पोलीस, तंत्रज्ञ असा मोठा फौजफाटा २० ऑक्टोबरपासून खून प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र, अद्यापही आरोपीपर्यंत पोहोचू शकले नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जवळे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेनंतर जवळेसह राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. महिलांची आंदोलने झाली भाजपच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राज्य सरकारच्या कारभार बोट ठेवले. यामुळे विषय राज्यात गेला. यामुळे पोलिसांना आव्हान निर्माण झाले.
जवळेतील मुलीवर अत्याचार होऊन खून झाला. त्यामुळे २० संशयित जणांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष कोणी अत्याचार केला, याची माहितीही पोलिसांना प्रत्यक्ष मिळेल, असे सांगितले जाते.
येथील मुलीच्या अत्याचार व खुनाचा तपास पोलीस अत्याधुनिक पद्धतीनेही करत आहेत. यात खून होण्याआधी तीन तास आणि नंतरचे असे जवळे परिसरात जवळपास साडेतीन हजार जणांचे कॉल झाले. त्याचा डेटा पोलिसांनी तपासून ६० ते ७० जणांना प्रत्यक्ष ताब्यात घेऊन त्यांच्या मोबाइलचे गुगल मॅपिंग, अंतर्गत चॅटिंग तपासले, तरीही अजून पोलिसांना आरोपीपर्यंत जाता आले नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा हतबल झाल्याचे दिसून येते.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सायबर सेल, महिलांचे विशेष पथक, फॉरेन्सिक लॅब, नगर, नाशिक, मोबाइल सेल, नाशिक, नगर, फिंगर प्रिंट तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी आदी सहा ते सात यंत्रणा आणि स्थानिकसह अनेक पोलीस कर्मचारी जवळे येथे तळ ठोकून आहेत. मात्र, अद्यापही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
COMMENTS