खरवंडी कासार गावातील अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाईसाठी करा खरवंडी कासार, प्रतिनिधी खरवंडी कासार येथे राष्ट्रीय महामार्ग ते गल्ली बोळापर...
खरवंडी कासार गावातील अतिक्रमणधारकांवर
कायदेशीर कारवाईसाठी करा
खरवंडी कासार, प्रतिनिधी
खरवंडी कासार येथे राष्ट्रीय महामार्ग ते गल्ली बोळापर्यंत अतिक्रमण धारकानी रस्त्याच्या कडेने ग्रामपंचायत जागेवर सार्वजणीक रस्त्यावर अतिक्रमण केल्याने गावाचा श्वास रोखला गेला आहे झालेल्या अतिक्रमणामुळे वाहण चालवणे अवघड झाले आहे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सरकारी जागेवर झालेली अतिक्रमण काढाण्याची मागणी माहीती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र जायभाये यांनी मुखमंत्री ते तहसिलदार यां सर्व प्रशााासणाला निवेदनााद्वारे केलीली आहे.
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या गावात गुंडांकडुन सरकारी जागेवर अतिक्रमण करुन धंदा व्यवसाय करण्यासाठी पञ्याचे शेड ठोकुन गाळे भाडे देऊन व्यवसाय चालवला जात आहे यामधून लाखो रुपये सरकारी जागेवर अतिक्रमण करुन स्थानिक गावगुंड मिळवत आहेत पाथर्डी तालुक्यातुन तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत राज्य महामार्ग मुंबई विशाखापट्टणम ६१ , पैठण पंढरपुर व लोहा बीड कंधार असे एकुण तीन राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे खरवंडी कासार गावातील मुख्य जाणार्या रस्त्यावरुन गहीनाथ फाटा ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत खरवंडी कासार गाव अतिक्रमणाने वेढले असुन यामुळे रस्त्यावर वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिला नाही तसेच सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढुन अनेक निष्पाप नागरीकांचा मृत्यु झाला आहे
तरी या घटनेची मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गंभीर दखल घेत खरवंडी कासार गावातील अतिक्रमण पाडण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना आदेश देऊन अतिक्रमण पाडून सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वेळोवेळी केलेली आहे तसे निवेदन दिलेले असल्याने अद्याप पर्यंत कारवाई झालेली नाही तेच पुन्हा अतिक्रमण नवीन करण्यासाठी काही ग्रामपंचायत सदस्य अंधारात सांगत आहेत जर आट दिवसात नवीन अतिक्रमण काढले नाही तर ग्रामपंचायत कार्यलयाला टाळे ठोकणार असल्याचे जायभाये यांनी सांगितले
खरवंडी कासार गावातील बाजारात पोलीस चौकी समोर नवीन अतिक्रमण केले आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी सांगितले आहे परंतु दोन दिवसात अतिक्रमण न काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
हनुमान खेडकर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात खरवंडी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या गावातील गोपिनाथ मुंडे चौक ते अण्णाभाऊ साठे चौक पर्यंत मुख्य रस्त्यावर पञ्याचे शेड ठोकुन गाळे भाडे देऊन व्यवसाय चालवणारे अतिक्रमणधारकांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आट दिवसांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार आहे -
शैलेंद्र जायभाये जिल्हाध्यक्ष माहीती अधिकार महासंघ,अहमदनगर
COMMENTS