कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा विजय : राजेश्वरी कोठावळे पारनेर प्रतिनिधी : केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषि विषयक कायदे माघारी घे...
कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचा विजय : राजेश्वरी कोठावळे
पारनेर प्रतिनिधी :
केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषि विषयक कायदे माघारी घेत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली आहे. त्यानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर हा तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा विजय असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी यांनी म्हटले आहे. हे तिन काळे कायदे रद्द व्हावे यासाठी विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शेतकरी कन्या राजेश्वरी कोठावळे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. शेतकऱ्यांच्या या मागणीला आता यश आल्याने हा खऱ्या अर्थाने सर्व आंदोलन करणार्या शेतकऱ्यांचा विजय असल्याचे शेतकरी कन्या राजेश्वरी कोठावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
COMMENTS