महापुरुषांचे विचार आचरणात आणा : डॉ. रफिक सय्यद -- टाकळी ढोकेश्वर येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन व संविधान दिन साजरा -- कार्यक्रमातून ...
महापुरुषांचे विचार आचरणात आणा : डॉ. रफिक सय्यद
--
टाकळी ढोकेश्वर येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन व संविधान दिन साजरा
--
कार्यक्रमातून दिला गेला वैचारिक सामाजिक संदेश
पारनेर/प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सामाजिक विचारांना आदर्श ठेवून आदर्श गाव ग्रामपंचायत टाकळी ढोकेश्वर, आम्ही टाकळीकर प्रतिष्ठान, व समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी ढोकेश्वर येथे क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन तसेच संविधान दिनानिमित्ताने पारनेर तालुक्यातील तसेच टाकळीढोकेश्वर परिसरातील पत्रकार मित्र व आदर्श शिक्षक यांचा सन्मान तसेच कोरोना योद्धा सन्मान सोहळ्याचे रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वैचारिक सामाजिक विचाराने संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी अहमदनगर सुधाकर भोसले, व्याख्याते डॉ. रफिक सय्यद, व्याख्याते डॉ. नागेश गवळी, ऍड. संभाजी बोरुडे, समता परिषद जिल्हाध्यक्ष अहमदनगर सुभाष लोंढे, टाकळी ढोकेश्वर मा. सरपंच शिवाजी खिलारी, निवृत्त पोलिस अधिकारी लोंढे साहेब, श्रावण गायकवाड, वसंत रांधवण, प्रकाश इघे सर, मोहन रांधवण, रतन रोकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी शिक्षक व पत्रकारांचा मोठा सन्मान सोहळा संपन्न झाला आनंदा झावरे, भाऊसाहेब रांधवण, आनंदा झरेकर, बिंदूकुमार नरड, अशोक वाळुंज, बाळासाहेब झावरे, राजेंद्र व्यवहारे, शिल्पा लोंढे, मीनाक्षी जाधव, मधुकर बर्वे सर, रमेश गायकवाड, बाळशिराम कारंडे, सोनल रोहोकले, सुरेश जावळे, शर्मिला मगर, बाळासाहेब इघे, बाळासाहेब गिरी, अंकुश अवघडे, शांताराम झावरे या शिक्षकांचा तसेच शशिकांत साळवे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पत्रकार सनी सोनावळे, शशिकांत भालेकर, चांद शेख, अनिल चौधरी, संतोष सोबले, दत्ता घाडगे, विजय गायकवाड, शुभम मेहेर, श्रीनिवास शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी व्याख्याते डॉ. रफिक सय्यद यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, राजेश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. एपी.जे. अब्दुल कलाम या महापुरुषांच्या जीवनावर आधारित वैचारिक असे व्याख्यान दिले व या माध्यमातून सामाजिक वैचारिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. डॉ. नागेश गवळी यांनीही यावेळी महापुरुषांच्या विचारांवर प्रकाश टाकत सामाजिक विचारांची मांडणी केली.
दरम्यान हा कार्यक्रम महात्मा फुले चौक टाकळी ढोकेश्वर येथे झाला हा वैचारिक सामाजिक कार्यक्रम करण्यामध्ये खऱ्या अर्थाने श्रावण गायकवाड वसंत रांधवण यांनी विशेष परिश्रम घेतले.