सुपा परिसरातील पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील सुपा परिसर...
सुपा परिसरातील पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात अल्प पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे ज्वारी हरभरा व मका पीक लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे धोक्यात आले आहे. या पिकांवर असलेल्या आळईने खोड पोखरुन ज्वारी जाग्यावरच कोलमडत आहे. यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
सुपासह भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे येथे अत्यंत कमी पाऊस झाला आहे. विहिरी तसेच तलाव कोरडे ठाक आहेत. तर सुपा, वाळवणे, रूईछत्रपती, आपधूप, वाघुंडे, रांजणगाव मशीद आदी ठिकाणी परतीच्या पावसाने पेरणी करून उगवलेल्या ज्वारी हरबरा व मका पीकांना चांगले जीवदान मिळाले आहे, मात्र पिकांवर लष्करी आळईचा प्रादुर्भाव झाल्याने हि पीके धोक्यात आली आहेत. हिआळई लष्करी आळई सारखीच असल्याने ती खोड पोखरते. पिकाचा शेंडा तसेच पाणेही खाऊन पीके फस्त करत आहे असे शेतकर्यांचे मत आहे. नुकतेच उगवन झालेला हरबरा देखील हि आळई खात असल्याने शेतकरी हैरान झाला आहे.
वातावरणातील बदलामुळे लष्करी अळीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय मदत मिळे पर्यंत तातडीने उपाययोजना करण्याचे कृषी विभागाने केले आहे. हि आळई लष्करी आळईच आहे त्यावर तातडीने औषध फवारणी करण आवश्यक आहे. यावर उपाय म्हणजे इमॅमेप्टीन बेन्झोएट ८ ग्रॅम किवां कोराजीन ८ मीली प्रती पंप प्रमाणे फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.