पारनेरमध्ये भाजप-शिवसेना युती अभेद्यच! खासदार सुजय विखेच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचा टाकळीमध्ये समारोप वयोश्री योजनेची सुरुवात...
पारनेरमध्ये भाजप-शिवसेना युती अभेद्यच!
खासदार सुजय विखेच्या हस्ते राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचा टाकळीमध्ये समारोप
वयोश्री योजनेची सुरुवात पारनेरमधूनच!
दिव्यांगांना मोफत मोटारसायकली देणार
झेडपी निवडणुकीनंतर पुन्हा एक शिबीर घेऊ
दर महिन्याला एक पिक्चर रिलीज करणार
पारनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्रात कोणतीही आघाडी होवो, पण पारनेर तालुक्यात भाजप शिवसेना युती अभेद्य राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या शिबिराच्या
समारोपाप्रसंगी खासदार विखे बोलत होते. याप्रसंगी जि. प. सदस्या सुप्रिया झावरे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जि. प. माजी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सुभाष दुधाडे, जिल्हा
मराठा संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, जि. प. माजी सदस्य अॅड. आझाद ठुबे, अॅड. रघुनाथ खिलारी, सुदेश झावरे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, कारभारी आहेर, बबन पवार, शिवाजी खिलारी, अरुण ठाणगे, भाऊसाहेब महाराज संस्थान, प्रवरा ग्रामीण संस्थी, विखे फाउंडेशनचे कर्मचारी, डॉक्टरांसह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील लाभार्थी उपस्थित होते. यावेळी खासदार विखे म्हणाले की, राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरूवात पारनेरमधूनच केली असून,
समारोपही पारनेरमध्येच करण्यात आला. तब्बल महिनाभरात ४० हजार लाभार्थी होऊन जागतिक विक्रम झाला आहे. या साहित्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करणार असल्याचे सांगत याकामी विखे पाटील फाउंडेशन, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, डॉक्टर यांचे सहकार्य मिळाले असून, जि. प. व पं.स. निवडणुकांनंतर परत शिबिराचे आयोजन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे रजिस्ट्रेशन करणार असून, ७८ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगांना मोफत मोटारसायकलचे वाटप करणार असून, इतर दिव्यांगांना साहित्य वाटप करणार आहे. महिलांसाठी शिलाई मशीनचेही वाटप करणार असल्याचे सांगून, दर महिन्याला एक पिक्चर रिलीज करणार असल्याचे खासदार विखे म्हणाले.
अबाल वृद्धांच्या चेहऱ्यांवर हास्य !
तब्बल ५२ बसेसच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील ४ हजार अबाल वृद्ध लाभार्थी या योजनेत सहभागी झाले होते. मात्र, यावेळी प्रवास, चहा, नाश्ता, पाणी, बैठक, अर्ज, तपासणी, सुरक्षा रक्षक आदी उत्कृष्ट नियोजन पाहता वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. अनेक अबालवृद्धांनी खासदार विखे यांना आशीर्वाद दिले.
COMMENTS