पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे-डॉ.श्रीकांत पठारे पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा पारने...
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे-डॉ.श्रीकांत पठारे
पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा
पारनेर/प्रतिनिधी
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून निसर्गाचे संतुलन अभाधित ठेवण्यासाठी प्रत्येक मानवाने किमान एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. पिंप्री जलसेन चे सरपंच सुरेश काळे त्यांनी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून निसर्गाप्रति सामाजिक बंधीलकी जपली आहे. त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने वृक्षारोपण करणे काळाची गरज असल्याचे मत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील युवा सरपंच सुरेश काळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपरी जलसेन येथील नवलाई मंदिर परिसरात वडाच्या झाडांची लावगड करण्यात आली. यावेळी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, ग्रामपंचत सदस्य आभूमन्यू थोरात, किशोर शेळके, सईद शेख, सचिन कदम, आदिनाथ कदम, गणेश थोरात, अक्षय कदम, सचिन काळे, अक्षय बोरुडे, निखिल शेळके, संदीप काळे, हरीश वाढवणे, जावेद शेख, भास्कर काळे, विश्वास काळे, आदींसह ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी शुभेच्छा देताना डॉ. पठारे म्हणाले की सरपंच सुरेश काळे अनेक समाजभिमुक कामे करून गावात विकासकामे करत आहे. पिंपरी जलसेन च्या विकास कामांसाठी निधी मिळून देण्यासाठी मी नेहमीच सरपंच काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे असे डॉ.पठारे म्हणाले.