लग्न जुळवून देतो सांगून युवकांची फसवणूक सुपा पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल पारनेर प्रतिनिधी : तुम्हाला लग्न करायचं का जमवायचे असेल ...
लग्न जुळवून देतो सांगून युवकांची फसवणूक
सुपा पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल
पारनेर प्रतिनिधी :
तुम्हाला लग्न करायचं का जमवायचे असेल तर माझ्या फोन पे, गुगल पे ला दोन हजार पाठवा असे म्हणून सुपा परीसरात युवकांना गंडा घातला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सुपा पोलिस ठाण्यात एक जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भोयरे गांगर्डा येथील ज्ञानेश्वर तुकाराम तरटे यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. तरटे यांच्या फिर्यादीवरून फसवणूक केल्याप्रकरणी संतोष काळे (रा. अस्तगाव, ता. पारनेर) याच्याविरोधात भादवि ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरटे हे आपल्या व्यवसायानिमित्त पुणे जिल्ह्या तील आळंदी येथे असतात. संतोष काळे याने २० जून रोजी फोन करून विचारले की, तुम्हाला लग्न करायचे आहे का व लग्न जमवायचे असेल तर तुम्ही मला दोन हजार रुपये फोन पे करा व तीन महीन्याच्या आत लग्न जमवून देतो. लग्न जमल्यानंतर तुम्हाला मला १० हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले असता तरटे यांनी काळे याच्या फोन पे वर एक हजार रुपये पाठवले. त्या व्यक्तीस वेळोवेळी फोन केला असता तो फोन उचलत नाही व लग्रही जमवले नसल्याचे लक्षात येताच तरटे यांनी सरळ सुपा पोलिस स्टेशन गाठले व आपली फसवणूक झाली असल्याची फिर्याद दिली आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने युवकांचे लग्न जुळवताना पित्याला मोठी कसरत करावी लागत आहे. मुलगी द्यायची म्हटल्यावर शेतकरी तर नकोच, त्याला काय नोकरी आहे, तो कोणता व्यवसाय करतो हे पित्याकडून पाहीले जाते. लग्न जमवताना येणाऱ्या असंख्य अडचणी पाहता तरुण वर्ग अशा लोभास पटकन बळी पडतात. अशाप्रकारे सुपा परीसरात अनेक युवकांकडून लाखोंची फसवणूक झाली असल्याची चर्चा आहे. तरूणांनी अशा लोभास बळी पडू नये असे आवाहन सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी केले आहे. पुढील तपास पोहेकॉ. शिंदे, कानगुडे करत आहेत.
COMMENTS