खासदार डॉ. सुजय विखे पाटील वाढदिवस निघोज येथे साजरा --------- संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने साडी व मिठाईचे ...
खासदार डॉ. सुजय विखे पाटील वाढदिवस निघोज येथे साजरा
---------
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने साडी व मिठाईचे वाटप
पारनेर प्रतिनिधी :
खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी गेली दोन वर्षात लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली असून सर्वसामान्य जनतेला मोठा आधार दिला असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे.
खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने गोरगरीब गरजू महिलांना साडी मिठाई तसेच मुलांना मिठाई वाटप संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार संदीप पाटील युवामंचचे प्रमुख पदाधिकारी निलेश घोडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी जानूबाई शाहरुख मदारी, ओमकार दुणगुले, समीर ढवळे, अर्जुन हक्के, अक्षय वरखडे,सागर वरखडे, अल्फेज इनामदार, सलीमभाई मदारी, चाॅंदभाई मदारी निघोज ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वराळ पाटील यावेळी म्हणाले खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब समाजाला मदत होईल
अशा प्रकारे सामाजिक उपक्रम माध्यमातून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी जनसेवेचे काम केले आहे.दरवर्षी संदीप पाटील गोरगरीबांच्या दिवाळी या उपक्रमातही दिवाळीमध्ये साडी मिठाई वाटप करीत दीड हजार कुटुंबांना आधार देण्याचे काम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून केले आहे.वाढदिवस असो की सण उत्सव असो सामाजिक उपक्रम माध्यमातून जनसेवेचे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वराळ पाटील यांनी व्यक्त केले आहे.संदीप पाटील युवामंचचे प्रमुख पदाधिकारी निलेश घोडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अल्पसंख्यांक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
COMMENTS