पळशी येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्नमार्गी पारनेर/प्रतिनिधी : पंचायत समिती...
पळशी येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन
पंचायत समिती सदस्या सुप्रिया साळवे यांच्या माध्यमातून पाणी प्रश्नमार्गी
पारनेर/प्रतिनिधी :
पंचायत समिती सदस्या सौ.सुप्रिया अमोल साळवे यांच्या विशेष प्रयत्नातुन व पंचायत समितीच्या माध्यमातून आज मौजे पळशी येथील गावठाणातील साळवे वस्ती येथे पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ मान्यवंराच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर वस्तीत महिला वर्गाला पाण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागल असल्या मुळे ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करुन निधीची तरतुद करण्यात आली.
दरम्यान पंचायत समिती सदस्य सुप्रिया अमोल साळवे या टाकळी ढोकेश्वर गणांमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत आज पर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत.
पळशी येथील गावठाणातील साळवे वस्तीवरील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. या कार्यक्रमास पळशी गावचे सरपंच आप्पासाहेब शिंदे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तालुका प्रवक्ते नंदू साळवे, माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर साळवे, रामदास साळवे, दीपक गुंजाळ, भास्कर शिंदे, चेअरमन अंबरनाथ वाळुंज ऋषिकेश गागरे, विकास अल्हाट, प्रवीण गागरे, तुषार साळवे, गीताराम साळवे ,संतोष साळवे, विश्वनाथ साळवे, अशोक साळवे, संदीप साळवे, रावसाहेब साळवे नितीन पाडळे, अविनाश साळवे व ग्रामस्थ तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साळवे वस्तीवरील महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी वणवण लक्षात घेऊन त्या ठिकाणचा पाणी टाकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आज पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून पाणी टाकीचे भूमिपूजन केले. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता.
सौ. सुप्रिया अमोल साळवे
(पंचायत समिती सदस्य, पारनेर)