पारनेर तालुक्यात भ्रष्टाचार निर्मूलन मोहीम राबविणार तक्रार नोंदणीसाठी अँटिकरप्शन च्या माध्यमातून टोल फ्री क्रमांक जाहीर करणार अँटी करप्शनचे ...
पारनेर तालुक्यात भ्रष्टाचार निर्मूलन मोहीम राबविणार
तक्रार नोंदणीसाठी अँटिकरप्शन च्या माध्यमातून टोल फ्री क्रमांक जाहीर करणार
अँटी करप्शनचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोज झावरे यांची माहिती
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात अँटिकरप्शन (भ्रष्टाचार निर्मूलन) फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी भ्रष्टाचार मुक्तीसाठी मोठे काम उभे करण्यात येणार आहे.
शासकीय स्तरावर सामान्य जनतेची अडवणूक होत असल्यास त्यासंबंधित समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम तालुकास्तरावर राबवणार असल्याचे अँटिकरप्शन ऑफ इंडिया फेडरेशनचे पारनेर तालुका अध्यक्ष मनोज झावरे यांनी सांगितले.
दरम्यान शासकीय विभागांमध्ये होणार्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला मदत करण्यासाठी अँटी करप्शन ऑफ इंडियाच्या वतीने तक्रार नोंदणी साठी टोल फ्री क्रमांक लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे झावरे यांनी सांगितले. त्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्त धोरण आखणार असून पूर्ण तालुक्यात काम करणार आहे.
भ्रष्टाचार मुक्तीसाठी पूर्ण तालुक्यात काम करण्यासाठी अँटिकरप्शन ऑफ इंडिया फेडरेशनची संघटन पूर्ण तालुक्यात तयार करणार असल्याचेही यावेळी अध्यक्ष मनोज झावरे यांनी सांगितले.
COMMENTS