भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी मंगळवारी रस्त्यावर सक्तीची वीज वसुली थांबवा; टाकळी ढोकेश्वर येथे आंदोलन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतो...
भूमिपुत्र शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी मंगळवारी रस्त्यावर
सक्तीची वीज वसुली थांबवा; टाकळी ढोकेश्वर येथे आंदोलन
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांची माहिती
पारनेर प्रतिनिधी
विद्युत महावितरण कडून रोहित्र बंद करून सक्तीने वीज वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी मंगळवार दि.२३ रोजी रास्ता रोको आंदोलन. करण्यात येणार असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर पारनेर तालुका अध्यक्ष विशाल करंजुले पारनेर तालुका युवक अध्यक्ष रावसाहेब झांबरे यांनी दिली या संदर्भातील निवेदन पोलीस स्टेशन तसेच तहसील व महावितरणला देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाली २०१८ पासून पिक विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली कोरोणा महामारीमुळे शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पुरता अडचणीत सापडला आहे.सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतीची लगबग सुरू आहे या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज असताना वीज महावितरण कडून रोहित्र बंद करून वीज बिलांच्या नावाखाली सक्तिने पठाणी वसुली सुरू केली आहे याविषयी वारंवार त्यांना सांगूनही रोहित्र बंद करण्याचे षड्यंत्र सुरू आहे.
याच्या निषेधार्थ तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी रास्ता रोको करत असल्याची माहिती भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, तालुकाध्यक्ष विशाल करंजुले,युवक तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे यांनी दिली आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पूर्णता महावितरण जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. या आंदोलनात राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे युवक जिल्हाध्यक्ष अमोल उगले जिल्हा सचिव संतोष कोरडे तालुका संपर्क प्रमुख महेश झावरे, पारनेर तालुका प्रवक्ते राजू रोकडे विद्यार्थी संघटना सचिव विशाल गागरे तालुका संघटक पाटीलबा काशीद, विशाल सोनवणे, कर्जुले हर्या शाखाध्यक्ष प्रविण आंधळे, पारनेर तालुका विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष अनिकेतदादा आंधळे, यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
COMMENTS