शरद पवारांच्या ' मार्गदर्शन वर्गात ' आ. नीलेश लंके यांचा ' धडा ' ! पारनेर प्रतिनिधी : करोना महामारीच्या काळात आमदार नी...
शरद पवारांच्या ' मार्गदर्शन वर्गात ' आ. नीलेश लंके यांचा ' धडा ' !
पारनेर प्रतिनिधी :
करोना महामारीच्या काळात आमदार नीलेश लंके यांनी करोना बाधितांसाठी केलेल्या कामाचे जगभराने कौतुक केले. या कामाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक सामाजिक चेहरा आ. लंके यांच्या रूपाने पुढे आला. आ. लंके यांच्या या कामाचे आजही सर्वत्र कौतुक होत असून लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणून आ. नीलेश लंके यांचे नाव सर्वत्र आग्रक्रमाणे घेतले जाते. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँगेसचे आमदार कशी सामाजिक बांधिकली जोपासत आहेत, हे सांगताना आमदार नीलेश लंके यांच्या कामाचे उदाहरण दिले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'मार्गदर्शनपर वर्गात' आ. लंके यांच्या कार्याचा 'धडा' अभ्यासला गेल्याने लंके यांच्या कामाचे चिज झाल्याच्या भावना लंके समर्थक व्यक्त करीत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक बांधलकी अधोरेखीत करताना आमदार नीलेश लंके यांनी करोना काळात केलेल्या कामाचा दाखला दिला.
पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कदाचित तरूण नसतीलही, परंतू लोकांची बांधीलकी जपाणारे, लोकांच्या सुख दुःखात समरस होणारे जास्तीत जास्त आमदार कुठे असतील तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. एकच उदाहरण संगतो तुम्हाला, करोना आला. पारनेरच्या आमदाराने 'हेल्थ कॅम्प' सुरू केला. सहा महिने हा आमदार तिथेच राहीला. घरी गेला नाही. स्वतःच्या आमदारकीचा पगार तिथे खर्च केला. अशा पध्दतीने त्यांनी काम केले. त्यांच्या घरी मी गेलो होतो. अक्षरशः दोन खोल्यांचे घर आहे. दोन खोल्या म्हणजे एक स्वयंपाकघर आणि बसायला काहीतरी पाहिजे म्हणून दुसरी खोली ! अत्यंत सामान्य परिस्थितीतील आमदार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आमदाराची परिस्थिती पाहिली नाही. त्याची बांधिलकी पाहिली. लोकांप्रती असलेली त्याची तळमळ पाहिली. आज त्याच्या कामाचा अनुभव लोकांना येत आहे."
धन्य झालो आम्ही !
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी शरद पवार म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठच असते. त्यांच्या 'मार्गदर्शन वर्गात' आमदार नीलेश लंके यांचा 'धडा' अभ्यासला गेला. पारनेर - नगर मतदारसंघातील जनतेसाठी ही अभिमानाची बाब आहे. 'आम्ही धन्य झालो' आधी प्रतिक्रिया अॅड. राहूल झावरे यांनी दिली.