सखाराम मंचरे आदर्श सदस्य पुरस्काराने सन्मानित. टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील तिखोल ग्रामपंचायतीचे सदस्य सखाराम मंचरे यांना ग्रामपंचा...
सखाराम मंचरे आदर्श सदस्य पुरस्काराने सन्मानित.
टाकळी ढोकेश्वर :
पारनेर तालुक्यातील तिखोल ग्रामपंचायतीचे सदस्य सखाराम मंचरे यांना ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पारनेर तालुक्यातील ढोकी येथे दि.१२ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्कार केंद्राचे उद्घाटन व धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या संस्कार केंद्राचे उद्घाटन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भुषणसिंहराजे होळकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले
यावेळी इंजि.डी.आर.शेंडगे ,दादाभाऊ चितळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी ढोकी, धोत्रे, तिखोल,ढवळपुरी,गाजीपुर,कासारे पळशी,वनकुटे येथील
समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्कारमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष पोपटराव महानोर, उपाध्यक्ष बाबासाहेब नऱ्हे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व आजची युवापिढी साठी संस्कारांची आवश्यकता केंद्राच्या माध्यमातून कशी होऊ शकते हे विशद केले.
इंजि. डी. आर.शेंडगे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी काशिनाथ दाते सरांच्या व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर समाजाची बैठक करुन सरकारने आरक्षणासाठी केंद्राकडे शिफारस पाठवावी अशी मागणी केली. त्यावर काशीनाथ दाते सर यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्याची ग्वाही दिली.तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील विकासकामांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी जबाजी नऱ्हे,किरण धरम, कैलास न-हे व युवकांनी परिश्रम घेतले.